Jayant Patil Meet To Sunil Tatkare Saam TV
मुंबई/पुणे

Jayant Patil Meet To Sunil Tatkare : भेटीचा वेगळा अर्थ काढू नका, सुनील तटकरेंसोबतच्या गळाभेटीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

Political News : मी शरद पवार यांच्यासोबत आहे म्हणून या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

साम टिव्ही ब्युरो

रुपाली बडवे

Mumbai News : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्यातील आजचा पहिलाच दिवस. आज विधीमंडळात आमदार निधी वाटपाचा मुद्दा गाजला. तर विधीमंडळाबाहेर राष्ट्रवादीच्या दोन प्रदेशाध्यक्षांची भेट गाजली. अधिवेशनामध्ये हे दोन्ही नेते एकमेकांसमोर येताच त्यांनी गळाभेट घेत राजकारणापलिकडच्या मैत्रीचे दर्शन घडवले.

राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांची गळभेट आज चर्चेत आहे. या दोन बड्या नेत्यांना भेटीनंतर राजकीय चर्चांनाही उधाण आलं होतं. यावर आता जयंत पाटील यांना प्रतिक्रिया दिली आहे.

सुनील तटकरे वेगळ्या पक्षात आहेत, मी आता वेगळ्या पक्षात आहेत. मात्र आमच्यात ऋणानुबंध असू शकतात. त्याचा राजकीय अर्थ काढू नये. सगळ्यांशी माझे चांगले संबंध आहेत, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. (Political News)

मी शरद पवार यांच्यासोबत आहे म्हणून या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये. आम्ही सुनील तटकरे यांच्यासोबत ३० वर्षे काम केले. तिथे खाजगी स्वरूपाचा विनोद झाला. विधानसभा परिसरात चोरुन फोटो काढणारे आहेत. खाजगी प्रसंगाशी चर्चा झाली, त्यातून विनोद झाला, असं स्पष्टीकरणही जयंत पाटील यांनी दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

SCROLL FOR NEXT