Politics over MLA fund Allocation : आमदार निधीवाटपाच्या मुद्द्याचे विधीमंडळात पडसाद, विरोधकांच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर

Political News : जनतेत फरक करुन नका, असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
Political NEws
Political NEws Saam TV
Published On

Mumbai News : पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवस निधीवाटपाच्या मुद्द्यावरुन चांगलाच गाजला. सत्ताधारी आमदारांना जास्त निधी मिळाल्याची टीका विरोधी गटाच्या आमदारांनी केली. जो सत्तेमध्ये आहे त्याला निधी मिळतो, जो सत्तेत नाही त्याला निधी नाही, असा मेसेज राज्यात पोहोचवला जात आहेत.

जनतेत फरक करुन नका, असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. या टीकेवरून देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही विरोधीपक्षात असताना आम्हाला फुटकी कवडी मिळाली नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

असमान निधीचं वाटप- अंबादास दानवे

सरकारकडून राज्यात असमान निधीचं वाटप करण्यात आलं आहे. विधानपरिषदेतील काही सदस्यांना एकाच वेळी तब्बल ४६ कोटींचा निधी दिला गेला आहे. त्यांनी सुचवलेल्या कामांची मंजुरी मागील १५ दिवसात झाली आहे. मात्र सरकारने सर्व आमदारांना कमी जास्त प्रमाणात समान पद्धतीने निधी द्यायला हवा. निधी कमी जास्त प्रमाणात होऊ शकतो. परंतु विरोधकांना निधी द्यायचाच नाही, अशी भूमिका घेतली जात आहे, असं अंबादास दानेव यांनी म्हटलं.

Political NEws
Harshwardhan Jadhav HeartAttack News : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात उपचार सुरु

ज्याचा मतदारसंघ सत्तेत त्याला निधी - बाळासाहेब थोरात

निधी वाटपावरुन मतभेद केले जात आहेत. राज्यात चर्चा आहे, ज्याचा मतदारसंघ सत्तेत त्याला निधी पोहोचत आहे. मात्र शेजाऱ्याला मिळत नाही. ही अवस्था चांगली नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. (Political News)

Political NEws
Amravati DCC Bank Election: अमरावती जिल्हा बँक अध्यक्षपदी बच्चू कडू यांचा विजय; आमदार यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का

मविआ सरकारच्या काळात फुटकी कवडी नाही मिळाली

विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, महाविकास सरकार असताना राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी एक फुटकी कवडी आम्हाला मिळाली नाही. अडीच वर्षात आम्हाला काहीच निधी मिळाला नाही. मी मुख्यमंत्री असताना अशी परिस्थिती नव्हती. त्यानंतर जयंतराव असताना आम्ही निधीसाठी कोर्टात गेलो, याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करुन दिली.

निधी मिळाला नाही, कोविड हे निमित्त होतं. तुम्ही गाय मारली आम्ही वासरू मारावं असं नसतं. विरोधीपक्ष नेत्यांनी आम्हाला जे शहाणपण शिकवलं ते त्यावेळी उपस्थित करायलं हवं होतं. आमच्यासोबत जे राष्ट्रवादीचे आमदार आले त्यांना निधी मिळाला आणि जे नाही आले त्यांनाही निधी मिळाला, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com