Kirit Somaiya on Jarandeshwar Co-operative Sugar Factory  Saam Tv
मुंबई/पुणे

Kirit Somaiya: "जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना २७००० शेतकऱ्यांचा ताब्यात द्यावा"- सोमय्यांची 'ईडी'कडे मागणी

Jarandeshwar Cooperative Sugar Factory Latest News: ईडीने मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्य को-ऑप बँक घोटाळा प्रकरणात सातारा येथील जरेंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जागा, इमारत आणि इतर बांधकाम जप्त केलं होतं.

सुरज सावंत

मुंबई: "जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना २७००० शेतकऱ्यांचा ताब्यात द्यावा" अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडे केली आहे. ते म्हणाले की, अजित पवारांनी (Ajit Pawar) जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना (Jarandeshwar Cooperative Sugar Factory) जो १२०० कोटींचा घोटाळा केला होता, ज्याची मालमत्ता ईडीने जप्त केली होती त्याला न्यायालयाने मान्यता दिली आहे. भारत सरकारने (Govt. Of India) आणि ईडीने हा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना पुन्हा २७००० शेतकऱ्यांचा ताब्यात द्यावा अशी मागणी केली आहे. (Kirit Somaiya on Jarandeshwar Co-operative Sugar Factory)

हे देखील पहा -

नेमकं काय आहे प्रकरण?

ईडीने मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्य को-ऑप बँक घोटाळा प्रकरणात सातारा येथील जरेंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जागा, इमारत आणि इतर बांधकाम जप्त केलं होतं. याबाबत ईडी आता न्यायालयाकडून मिळालेल्या जप्तीच्या कारवाईची ऑर्डर मिळण्याची वाट पहात आहे. ही ऑर्डर मिळताच ईडी जरंडेश्वर कारखाना ईडीच्या मालकी अखत्यारित आणण्याची प्रक्रिया सुरू करेल.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सुमारे 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा (Scam) झाला होता. याबाबत मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेने 22 ऑगस्ट 2019 रोजी हा गुन्हा दाखल केला होता. याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या अनुशंगानेही केला जात होता. याच गुन्ह्याच्या आधारावर ईडीने आपला गुन्हा दाखल केला करून तपास सुरू केला होता. तपासात जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची 2010 सालात विक्री करण्यात आली होती. वेळी तो मूळ किंमतीच्या कमी किंमतीत विकण्यात आला होता. त्याचप्रमाणे त्याची योग्य कार्यपद्धतीने पाळण्यात आली नव्हती. याच काळात अजित पवार हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर होते.

याच काळात हा कारखाना मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस प्रा.लिमिटेडला विकण्यात आला. नंतर तात्काळ हा कारखाना जरंडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेडला भाडे तत्वावर देण्यात आला. जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मोठ्या प्रमाणात स्पार्कलिंग सोईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा हिस्सा आहे. ही कंपनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या मालकीची आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT