Jaipur-Mumbai Train Firing News In Marathi Saam TV
मुंबई/पुणे

Jaipur-Mumbai Train Firing: मृतदेह खाली पडले होते, तो बंदूक घेऊन फिरत होता; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनेचा थरार

Jaipur-Mumbai Train Firing Latest Updates: दरम्यान, ही घटना नेमकी कशी घडली? त्यावेळी काय घडलं होतं? याबाबत प्रत्यक्षदर्शींनी थरार सांगितला.

साम टिव्ही ब्युरो

Jaipur-Mumbai Train Firing Latest Updates: जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये सोमवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास भयानक घटना घडली. एका आरपीएफ जवानाने धावत्या ट्रेनमध्ये आपल्या सहकाऱ्यासह प्रवाशांवर अंदाधुंद गोळीबार केला.

या घटनेत एका पोलिसासह ४ प्रवाशांचा मृत्यू झाला. दहिसर ते मीरारोड स्थानकादरम्यान हा थरकाप उडवणारा प्रसंग घडला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू केली आहे.

दरम्यान, ही घटना नेमकी कशी घडली? त्यावेळी काय घडलं होतं? याबाबत प्रत्यक्षदर्शींनी थरार सांगितला. ही घटना घडली तेव्हा जयपूर-मुंबई एक्सप्रेस ट्रेनच्या बोगी क्रमांक बी-५ मध्ये अनेक प्रवाशी होते. या बोगीतील एसी कोच अटेंडंट कृष्णकुमार शुक्ला यांनी घडलेल्या थरारक प्रसंगाची माहिती सांगितली.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनेचा थरार

या घटनेबाबत माहिती देताना एसी कोच अटेंडंट कृष्णकुमार शुक्ला म्हणाले, सकाळी ५ वाजेच्या सुमारास बोगीत गोळीबाराचा आवाज आला. मी एसी कोचच्या दिशेने गेलो तेव्हा मृतदेह खाली पडलेले दिसले. पोलीस कॉन्स्टेबलच्या हातात रिव्हॉल्व्हर होती आणि तो डब्यात फिरत होतो. ASI साहेब खाली पडले होते. त्या पोलीस कॉन्स्टेबलने इतर प्रवाशांवरही गोळ्या झाडल्या होत्या.

"आम्ही ही घटना लांबूनच बघत होतो. या संपूर्ण प्रकारानंतर बोगीतील अनेक प्रवासी प्रचंड घाबरून गेले होते. घटनेनंतर आरोपीने ट्रेनची चैन खेचली आणि पळून गेला, अशी माहिती कृष्णकुमार शुक्ला यांनी दिली. दरम्यान, जीआरपीच्या जवानांनी गोळीबार करणाऱ्या आरपीएफ कॉन्स्टेबलला ताब्यात घेऊन बोरीवलीला आणलं आहे.

गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या ४ जणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, मानसिक तणावातून आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबलने गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण देश हादरवून गेला आहे. सध्या पोलिस आरोपी काँन्स्टेबलची चौकशी करत आहेत. त्याने हा गोळीबार का केला? याबाबत पोलीस माहिती घेत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू

Cheesy White Sauce Maggi: चमचमीत नाश्ता हवाय? बनवा चीज व्हाईट सॉस मॅगी, सोपी आहे रेसिपी

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT