Vasant More  Saam Tv
मुंबई/पुणे

राज ठाकरेंच्या कार्यक्रमाला जाणार का? वसंत मोरेंनी थेट सांगितलं

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोगें उतरवा नाही तर मशिदींपुढे स्पीकरवर हनुमान चालीसा लावा असा आदेश मनसैनिकांना दिला होता.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे: मशिदींवरील भोंग्यांवरून राज्यभरात वाद सुरू असताना आता हनुमान जयंतीच्या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते पुण्यात (Pune) महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हनुमान चालीसाचे (Hanuman Chalisa) सामूहिक पठण देखील होणार आहे. शनिवारी (१६ एप्रिलला) सायंकाळी सहा वाजता कुमठेकर रस्त्यावरील खालकर चौक मारुती मंदिर येथे ही आरती होणार आहे. या कार्यक्रमाला पुणे मनसेचे नेते वसंत मोरे जाणार का नाही यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी मशिदींवरील भोंग्यावरुन वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. राज ठाकरे यांची वसंत मोरे यांनी मुंबईत भेट घवून नाराजी दूर झाल्याचे सांगितले होते. आता यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे पुण्यात आले आहेत. यात ते उद्या शनिवारी हनुमान चालिसा पठण करणार आहेत. या कर्यक्रमाला मोरे उपस्थित होणार का यावर चर्चा सुरु झाल्या आहेत.

यावर वसंत मोरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाला जायचं की नाही हे अजून ठरवलेल नाही. उद्या सकाळी मी राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. हनुमान चालिसा कार्यक्रम पत्रिकेवर कुठेही मनसेचं (MNS) नाव नाही. तो पक्षाचा कार्यक्रम आहे की नाही हे माहीत नसल्याने अजून मी ठरवलं नाही, असं वसंत मोरे (Vasant More) म्हणाले.

३ मे पर्यंत भोंग उतरविण्याची मुदत

गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोगें उतरवा नाही तर मशिदींपुढे स्पीकरवर हनुमान चालीसा लावा असा आदेश मनसैनिकांना दिला होता. तर ठाण्यात झालेल्या सभेत ३ में पर्यंत भोंग उतरविण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यात वाद सुरू झाला आहे. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. शनिवारी हनुमान जयंती साजरी करण्यासाठी पुण्यातील सर्व हनुमान मंदिरांमध्ये तयारीला वेग आलेला असताना आता याच दिवशी राज ठाकरे हे पुण्यात आहेत. दीडशे वर्ष जुन्या खालकर चौकातील मारुती मंदिरात राज ठाकरे हे आरतीसाठी येणार आहेत.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT