Devendra Fadnavis on Chandrakant Patil Ink Attack
Devendra Fadnavis on Chandrakant Patil Ink Attack Saam TV
मुंबई/पुणे

Chandrakant Patil: दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही टार्गेट करणं योग्य नाही; फडणवीसांकडून पाटलांवरील शाईफेकीचा निषेध

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Chandrakant Patil : भाजप नेते, मंत्री चंद्रकात पाटील यांनी काल औरंगाबादेत महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आज, शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शाईफेक करण्यात आली आहे.

या घटनेनंतर भाजप नेते अतिशय आक्रमक झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री यांनीही या घटनेबाबत नाराजी व्यक्त करत शाईफेकीला विरोध दर्शवला आहे. फडणवीस म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही अश्या पद्धतीने टार्गेट करणं हे योग्य नाही असं म्हणत त्यांनी या शाईफेकीचा निषेध केला आहे. (Maharashtra News)

फडणवीस म्हणाले, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही अश्या पद्धतीने टार्गेट करणं हे अयोग्य नाही. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. शब्द चुकला असेल तरी आशय लक्षात घेतला पाहिजे. मी माध्यमांना दोष देत नाही पण आशय दाखवायला पाहीजे. जे आंदोलन करत आहे. चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही अश्या पद्धतीने टार्गेट करणं हे योग्य नाही.

अशा पद्धतीचे राजकारण बरोबर नाही. आम्हीदेखील विरोधी पक्षात होतो, सीमा प्रश्नापेक्षा यावर राजकारण जास्त होत आहे असं फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत. तसेच बोलताना भान राखलं पाहिजे, पण आशय समजून घेतला पाहिजे. आपण आशय समजणार नसेल तर महापुरुषांचा देखील अपमान होईल असं फडणवीस म्हणाले.

सीमाप्रश्नावर उद्धव ठाकरेंनी २ वर्ष काय केलं?

फडणवीस म्हणाले, सीमाप्रश्न कालच तयार झाला अशा पद्धतीची वक्तव्य केली जात आहे. आमच्या सरकारला ६ महिने झाले, उध्दव ठाकरेंनी दोन वर्षात काय केलं? एखादी केस लावली का? महाराष्ट्राची बाजू कर्नाटकपेक्षा भक्कम आहे, पण ते न्यायालयावर सोडू, यावर कोर्टात निर्णय लागेल असं फडणवीस म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

विरोधी पक्षनेत्यांची नावं का वगळली?

दरम्यान समृद्धी महामार्ग उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत दोन्ही विरोधी पक्षनेत्यांची नावं नाहीत याबाबत फडणवीसांना विचारलं असता ते म्हणाले की, प्रोटोकॉलनुसार अशा कार्यक्रमात विरोधी पक्षाचे नाव टाकत नाही. मी जेव्हा विरोधी पक्षनेता होतो तेव्हा माझं पण नाव नव्हतं. जे प्रकल्प मी सुरू केले त्यात देखील माझं नाव नव्हतं असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट; पुढील ४ दिवस विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये गारपीटीची शक्यता

Pune Lok Sabha 2024: प्रचाराचा शेवटचा टप्पा; आज पुण्यात सभांचा धडाखा; अजित पवार, सुप्रिया सुळे अन् देवेंद्र फडणवीस उमेदवारांच्या प्रचारार्थ मैदानात

Madhya Pradesh Election: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 'या' चार जिल्ह्यांत फेरमतदान होणार

Horoscope: लग्नाचा योग, व्यवसायात यश; तुमच्या राशीत काय?

Todays Horoscope: व्यवहारात सतर्कता, जोडीदारासोबत प्रेमाने वागा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय?

SCROLL FOR NEXT