The Kashmir Files Saam TV
मुंबई/पुणे

The Kashmir Files: 'गृहमंत्री, संजय राऊत 'काश्मीर फाईल्स'वर टीका करतायत हे चांगलंच'

'काश्मीर फाईलसमध्ये दाखवलेली परिस्थिती जे भयाण चित्र दाखवल ते वस्तुस्थिती नाही का ?'

विश्वभूषण लिमये

पुणे - पुण्यात भाजपाकडून भाजपा (BJP) कार्यालयासमोर महाविकास आघाडी विरोधात होळी साजरी करण्यात आली. देशद्रोही दाऊदचे सरकार, राक्षसी सरकार, भ्रष्टाचारी सरकार, घोटाळेबाज सरकार अशा आशयाच्या फलकांना अग्नी देऊन प्रतिकात्मक होळी भाजपकडून केली गेली. भाजपच्या होळीआधी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) देखील अशाच पद्धतीने केंद्र सरकारच्या विरोधात प्रतिकात्म होळी केली होती.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकार मधील दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) संजय राऊत (Sanjay Raut) हे काश्मीर फाईल्स वर टीका करतायत हे चांगलंच आहे. त्यामुळे लोकांना कळेल हे कोणाच्या बाजूने आहेत. डिझेल पेट्रोलसाठी महाविकास आघाडी सरकारची होळी केली पाहिजे. रशिया-उक्रेन युद्ध (Russia-Ukraine war) सुरु असताना डिझेल आणि पेट्रोलचे भाव स्थिर आहेत त्यामुळे महागाई विरोधात बोलण्याचा महाविकास आघाडी सरकारचा (MVA Goverment) मुद्दाच बाद झाला असल्याचंही पाटील म्हणाले.

हे देखील पहा -

सगळ्या वाईट प्रवृत्ती जाळण्याच प्रतीक म्हणजे होळी आहे. त्यामुळे हे सरकार सामान्य माणसावर अन्याय करतय, सरकारला आमदाराचा निधी वाढवण्यासाठी, त्यांच्या ड्रायव्हरचा पगार वाढवण्यासाठी पैसे आहेत. मात्र शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत. एस टी कामगारांचा विषय सुटत नाही, महिलांवरील अत्याचार कमी होत नाहीत. त्यामुळे या सगळ्या वाईट प्रवृत्ती ची होळी आज पुण्यातील भाजप कार्यालय इथे करण्यात आलेली आहे. संजय राऊत यांच्या बद्दल बोलण्यात काही पॉइंट नसल्याचही ते म्हणाले.

काश्मीर फाईलसमध्ये (The Kashmir Files) दाखवलेली परिस्थिती जे भयाण चित्र दाखवल ते वस्तुस्थिती नाहीय का ? हे एकदा मान्य करा. काश्मीर मधला हिंदू (Hindu) माणूस पळून नाही का गेला, काश्मीर मधल्या महिलांवर बलात्कार झाले नाहीत का, तिथल्या पंडितांच्या प्रॉपर्टी हडप नाही केल्या का? देशाचा खरा इतिहास दाखववायलाच हवा आम्ही लोकांना तो सिनेमा दाखवू तुम्ही फार काळ सत्य दाबून ठेऊ शकत नाही असही पाटील म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्हाला एकत्र आणायला बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT