Cm Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

CM Eknath Shinde Exclusive : 'महायुतीचा कॅप्टन मीच', CM शिंदे काय म्हणाले? वाचा

Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजेनवरून महायुतीत श्रेयवादाची लडाई सुरु आहे का? यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.

Satish Kengar

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सध्या राज्यभरात खूपच चर्चेचा विषय ठरत आहे. सरकारच्या या योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता याच योजनेवरून महायुती सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई रंगल्याच्या बातम्यात समोर येत आहे. श्रेयवादाच्या याच प्रश्नावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच उत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज साम टीव्हीच्या विशेष कार्यक्रम 'ब्लॅक अँड व्हाईट'मध्ये उपस्थितीती लावली. यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे नाव लहान असतं तर बरं दिसलं असतं. याचं नाव फक्त लाडकी बहीण योजनाच असायला हवं होतं, असं अजित पवार यांचं म्हणणं आहे. यात मुख्यमंत्री हा शब्द गाळला आला असता, असंही बोललं जात आहे. यातच या योजनेवरून आता महायुतीत शेऱ्यवादाची लडाई सुरु झाली आहे का? यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ''याचं सर्व श्रेय आमच्या बहिणींना आहे. ज्या बहिणांना याचा लाभ मिळतोय. त्या बहिणांसाठी आम्ही ही योजना आणली. यामुळे श्रेयवादामध्ये आम्ही कधी पडत नाही.''

महायुतीचा कॅप्टन मीच

याच प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, ''श्रेयवादाच्या लढाईत आम्ही कधी पडत नाही. मुख्यमंत्री हा प्रमुख असतो, टीमचा कॅप्टन म्हणून. लोक सगळे सुज्ञ आहेत, श्रेयवादात आम्ही पडत नाही. आम्ही महायुती म्हणून काम करतोय. माझ्या बहिणींना मी श्रेय देतो.''

किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, याबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ''महाराजांच्या पुतळा प्रकरणी चौकशी सुरू आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पण याचे राजकारण सुरू आहे. आम्ही अनेक सूचना केल्या आहेत. जोडे मरो आंदोलन केले, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. न शोभणारे कृत्य आहे हे.''

बदलापूर प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, ''बदलापूर प्रकरण दुर्दैवी आणि वेदना देणारे. लहान मुलीबद्दल कृत्य शोभणारे नाही. फाशी होण्यासाठी केस फास्ट ट्रॅकवर आहे. युद्ध पातळीवर प्रकिया पुढे नेतोय.पण त्याचे पण राजकारण करण्यात आलं. ते बदलापूरकर होते का?''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medicine Price Drops : दिलासादायक! BP, शुगर अन् डायबिटीजच्या गोळ्या झाल्या स्वस्त

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

SCROLL FOR NEXT