Raj Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

उद्धव ठकरेंच्या अंगावर एक तरी केस आहे का?; राज ठाकरेंचा सवाल

मी केलेल्या टोल नाके, रेल्वे नोकरी या सगळ्या आंदोलनांना यश आले आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: मनसेच्या (MNS) गुढी पाडवा मेळाव्यापासून राज ठाकरे चांगलेच चर्चेत आले आहेत. गुढी पाडवा मेळ्यात त्यांनी राज्य सरकारला मशिदीवरील भोंग्यावरुन इशारा दिला होता. यानंतर त्यांच्यावर राज्यातून टीका करण्यात आल्या. यानंतर मुंबईत शिवसेनेनेच्या झालेल्या सभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना यांची सर्व आंदोलने फेल गेली आहेत. एकाही आंदोलनाला यश आलेले नाही, असा आरोप केला होता. या टीकेला आज राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यात उत्तर दिले. उद्धव ठकरे यांच्या अंगावर आंदोलनाची एक तरी केस आहे का, असा सवाल केला.

मी जेवढी आंदोलने केली तेवढ्या सगळ्या आंदोलनांना यश आले आहेत. रेल्वे भरतीवेळी केलेली आंदोलनाही यश आले आहे. त्यावेळीपासूनच रल्वेची भरती त्या त्या राज्यातील भाषेत होत आहे. टोल नाक्यांच्या आंदोलनाही यश आले आहे. मी ज्यावेळी आंदोलने केली त्यावेळी पासूनच ६० ते ७० टोल नाके बंद केली आहेत, अंसही राज ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्यावर एकतरी आंदोलनाची केस आहे का हे त्यांनी अगोदर सांगावे, असा सवाल राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला.

अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर झाल्यानंतर अनेकांच्या पोटात दुख:यला लागले म्हणात राज ठाकरे यांनी शिवनसेनेवर नाव न घेता टीका केली. अयोध्येतील एक खासदार उठून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात बोलता, ही मोठी गोष्ठ आहे. अयोध्येत मोठा ट्रॅप रचला होता. अयोध्येत काही झाले असते तर मनसेच्या कार्यकर्त्यांवर केसेस टाकल्या असत्या, मला माझ्या कार्यकर्त्यांना अडचणीत आणायचे नाही, अस राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्पष्ट सांगितले.

यावेळी राज ठाकरे यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका केली. मातोश्री बंगला काय मशिद आहे का? असा सवाल ठाकरेंनी केला. आपलं हिंदुत्व झोंबल बाकी काही नाही अशी टीका हिंदुत्वावरुन राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केली.

पुढे बोलताना राज ठाकरे यांनी नाव न घेता शरद पवार यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, आपल्या सभेला हॉल वगैरे परवडत नाही. पण मी पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं एसपी कॉलेज बघा मात्र त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की हल्ली आम्ही कुणालाच देत नाही. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही. नदीपात्राचा विषय झाला. पण एकूणच सध्याचं हवामान पाहाता कोणत्याही वेळी पाऊस पडेल अशी चिन्ह आहे. मी म्हटलं निवडणुका नाहीत, उगाच कशाला भिजत भाषण करायचं, असं म्हणत भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठकरे यांनी शरद पवारांना टोला लगावला.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी इंडिया आघाडीचा मोर्चा- वर्षा गायकवाड

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

Seasonal Fruits : कोणत्या हंगामात कोणती फळे खावी? ९९% लोक करतात 'ही' १ चूक

ATM Robbery : नाईटी, मास्क घालून आले अन् SBI चं एटीएम फोडले; २५ लाख घेऊन चोर पसार, CCTV पाहून पोलीसही चक्रावले

SCROLL FOR NEXT