Kalyan Dombivali Drugs Case Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Dombivli Crime : ३० किलो गांजा, ३ आरोपी; कल्याण-डोंबिवलीच्या टोळीचं मध्यप्रदेश कनेक्शन, काय आहे प्रकरण? वाचा

Drugs News : दोन दिवसांमध्ये पोलिसांनी तब्बल ३० किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी ३ तस्करांना ताब्यातही घेतले आहे. हे गांजा तस्कर मध्यप्रदेशहून रेल्वेने कल्याण-डोंबिवलीत गांजा आणत असल्याची माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

अभिजीत देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

कल्याण डोंबिवली परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. डोंबिवली पोलीस स्थानक आणि कल्याण डीसीपी स्कॉडच्या संयुक्त कारवाईत तब्बल ३० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे अमली पदार्थ कुठून आले? आरोपींनी हे कुठून मिळवले आणि हे पदार्थ कोणाला विकणार होते याचा पोलीस तपास करत आहेत.

डोंबिवली पूर्वेकडच्या आयरेगाव परिसरात डीसीपी स्कॉडचे पथक गस्त घालताना एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत होता. पोलिसांनी त्याची विचारपूस केली. तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडे सात किलो गांजा सापडला. किरण शाह असे या तरुणाचे नाव आहे.

चोळेगाव परिसरात गांजा तस्कर येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. घटनास्थळी दोघे जण बॅग घेऊन फिरत होते. पोलिसांनी त्यांची झडती घेतली. तेव्हा त्यांच्या बॅगेमध्ये २३ किलो गांजा आढळून आला. सचिन मोरे आणि संजू लोहार अशी गांजा तस्कराची नावे आहेत.

फक्त दोन दिवसात पोलिसांनी तब्बल ३० किलो गांजा जप्त केला आहे. तसेच तस्करांना अटक केली आहे. हे तस्कर मध्यप्रदेशहून ट्रेनने गांजा कल्याण-डोंबिवलीमध्ये आणत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या तिघांच्या विरोधात याआधीही गुन्हे दाखल असल्याचेही म्हटले जात आहे.

मागच्या महिन्याभरापासून अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी कल्याण डीसीपी स्कॉड पथक कारवाई करत आहे. कल्याण डोंबिवलीतील विविध पोलीस स्थानकांमध्ये गेल्या महिन्याभरात अमली पदार्थ तस्करीसंबंधित १४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात २३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्क्कादायक! बहिणीसोबत तरुणाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, अपहरण केलं अन्...

Blood sugar control: डायबिटीजमध्ये 3 छोट्या चुका पडू शकतात महागात; ब्लड शुगर वाढू नये यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: धरण भरलं, पण जळगाव तहानलेलंच! हतनूरचं लाखो लिटर पाणी समुद्रात

DA Hike: सरकारी कर्मचारी अन् पेन्शनधारकांची लॉटरी! महागाई भत्त्यात मोठी वाढ; पाहा किती वाढणार पगार?

Moving car safety: धावत्या गाडीत सीट बदलणं का धोकादायक? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT