Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर; काँग्रेस विद्यार्थी प्रदेशाध्यक्षाची उपाध्यक्षला लाथाबुक्क्यांनी मारहाण

Congress Internal Conflict : पुणे शहर काँग्रेस कमेटीमधील ज्येष्ठ नेत्यांच्यामधील अंतर्गत वाद हे आपल्याला नेहेमी पाहायला मिळतो आणि याचा फटका देखील शहर काँग्रेसला बसलेला आहे.

प्रविण वाकचौरे

सचिन जाधव

Pune News :

काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत मतभेदांची नेहमीच चर्चा होता. वरिष्ठ नेत्यांमधील धुसपूस अनेकदा समोर आली आहे. मात्र युवा नेत्यांमधील सुप्त संघर्षही आता समोर आला आहे. पुण्यात काँग्रेस भवनमध्येच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जोरदार राडा पाहायला मिळाला.

काँग्रेस विद्यार्थी प्रदेशाध्यक्षांसह ४ जणांनी जिल्हा उपाध्यक्षला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. पुणे शहर काँग्रेस कमेटीमधील ज्येष्ठ नेत्यांच्यामधील अंतर्गत वाद हे आपल्याला नेहेमी पाहायला मिळतो आणि याचा फटका देखील शहर काँग्रेसला बसलेला आहे. (Latest Marathi News)

ज्येष्ठांच्या बरोबर विद्यार्थी काँग्रेसमधील अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस भवनमध्ये विद्यार्थी प्रदेशाध्यक्षकडून विद्यार्थी संघटनेच्या जिल्हा उपध्यक्षला काँग्रेसभवनामध्येच विटाने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी मारहाण गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संघटनेतील पद वाटप करण्यावरून भांडण झाल्याची माहिती आहे. शिवाजीनगर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Kidney Stone: टोमॅटो खाल्ल्याने किडनीमध्ये स्टोन होतो? डॉक्टरांनी सांगितलेलं सत्य वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Gold Price Today: खुशखबर! ऐन गणेशोत्सवात सोन्याच्या दरात मोठी घसरण! 18K, 22K आणि 24K सोन्याचे आजचे दर वाचा

Garuda Purana: मृत्यूनंतर आत्म्याला नवीन शरीर किती दिवसांनी मिळतं? गरुड पुराणात दिलीये माहिती

Bipasha Basu: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रोटीन पावडरमध्ये अळ्या; तुकाराम मुंढेंना टॅग करत केली कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT