विमा कंपन्यांनी विमा धारकांना चुना लावला, सरकारने पैसा वसूल करावा - दीपेश म्हात्रे प्रदीप भगणे
मुंबई/पुणे

विमा कंपन्यांनी विमा धारकांना चुना लावला, सरकारने पैसा वसूल करावा - दीपेश म्हात्रे

विमा कंपन्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली : कोरोनाच्या कोरोना सुरुवातीच्या काळात (First Wave of Corona) रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. मोफत उपचार घेणाऱ्या 40 टक्के रुग्णांकडे आरोग्य विमा पॉलिसी (Health Insurance) होती. त्या कंपन्यांनी रुग्णांना त्याचा लाभ दिला नाही. कंपन्यांनी सरळ पॉलिसीधारकास (Insurance Holders) चुना (Fraud) लावला आहे. या प्रकरणी विमा कंपन्यांच्या विरोधात  येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल अशी माहिती शिवसेनेचे (Shivsena) माजी नगरसेवक (Ex Corporator) आणि युवा जिल्हाधिकारी दीपेश म्हात्रे (Dipesh Mhatre) यांनी पत्रकारांना दिली आहे. (insurence company is doing fraud with insurance holders says dipesh mhatre)

हे देखील पहा -

आपल्याला काही आजार झाल्यास त्याचा विमा अनेक लोक काढतात. कोरोना संकट काळात विमा काढलेल्या नागरीकांना दिलासा होता. मात्र कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा अनेक कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. ज्या सामान्य नागरीकांकडे पैसा नव्हता, तसेच त्यांनी विमा देखील काढलेला नव्हता. त्यांच्या उपचारावर सरकारने केलेला खर्च हा सरकारची नैतिक जबाबदारी होती. मात्र ज्या रुग्णांनी सरकारी इस्पितळातून आणि क्वारंटाईन सेंटर मधून मोफत उपचार घेतले, त्यांपैकी 40 टक्के रुग्ण हे विमा पॉलिसीधारक होते, त्या रुग्णांना विमा कंपन्यांनी लाभ दिला नाही. त्याचे कारण त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात  मोफत उपचार करण्यात आले. प्रत्यक्षात हा लाभ विमा कंपन्यांनी दिला पाहिजे होता. ज्या कंपन्यांनी विमाधारकांना चुना लावला आहे. त्या विमा कंपन्यांकडून पैसा वसूल केला जावा.

हा पैसा केंद्र व राज्य सरकारने वसूल करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. हा पैसा वसूल केल्यास राज्य सरकारच्या तिजोरीत 1200 कोटी रुपये जमा होऊ शकतात. मात्र या विमा कंपन्या बड्या आहेत. त्या न्यायालयात जाऊन पैसा देण्यास नकार देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी या कंपन्यांच्या विरोधात येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करुन दाद मागितली जाणार आहे. यातून कंपन्यांनी नागरीकांची केलेली फसवणूक चव्हाट्यावर आणणे हाच उद्देश असल्याचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले. आता याला विमा कंपन्याकडून काय उत्तर येते पाहावे लागेल.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

SCROLL FOR NEXT