Information on fire safety in Mumbai will be available on the website soon
Information on fire safety in Mumbai will be available on the website soon Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Fire Brigade: मुंबईतील अग्निसुरक्षेबाबत माहिती लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध होणार

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरात वारंवार लागणाऱ्या आगीनंतर अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई अग्निशमन दलातर्फे (Mumbai Fire Brigade) इमारत तपासणी प्रणाली विकसित केली जात असून लवकरच अग्निसुरक्षेबाबत एकत्रितरित्या सर्व माहिती लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (Anil Galgale) यांनी दिली आहे. (Information on fire safety in Mumbai will be available on the website soon)

हे देखील पहा -

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबईत (Mumbai) लागणाऱ्या आगी व उपाययोजनांबाबत तक्रार करत आरोप केला होता की, अग्निसुरक्षेबाबत कोणत्याही प्रकाराची माहिती उपलब्ध केली जात नाही. अनिल गलगली यांच्या तक्रारीची दखल मुंबई अग्निशमन दलाने गांभीर्याने घेतली आहे. प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब यांनी अनिल गलगली यांस कळविले आहे की भविष्यात मुंबई शहरातील सर्व इमारतीतील अग्निसुरक्षा संबंधीची माहिती जनतेसाठी संकेतस्थळावर उपलब्ध होणाच्या अनुषंगाने मुंबई अग्निशमन दलातर्फे इमारत तपासणी प्रणाली विकसित करण्यात येत आहे. सदर प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर माहिती एकत्रितरित्या उपलब्ध होणार आहे.

मुंबई अग्निशमन दलाकडे शहरातील वर्ष 2006 पूर्वी बांधलेल्या सर्व इमारतींची माहिती उपलब्ध नसून महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 मधील कलम 3(1) आणि 3(3) नुसार माहे जानेवारी 2022 मध्ये प्राप्त झालेले 2556 फार्म बी संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत. अग्निशमन दलातर्फे माहे जून 2021 पर्यंत 6423 व्यक्तींना अग्निसुरक्षेचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे, तर जून 2021 पासून 850 नागरिकांना एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले आहे. मॉक ड्रिल, एव्हँक्यूएशन ड्रिल, गृहिणीकरिता एलपीजी वायूची हाताळणीबाबत 95 प्रात्यक्षिके व प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर मागील 5 वर्षात आगीच्या एकूण संख्येत घट झाली आहे. यात वर्ष 2017 मध्ये 4454, वर्ष 2018 मध्ये 4959, वर्ष 2019 मध्ये 5324, वर्ष 2020 मध्ये 4512 आणि वर्ष 2021 मध्ये 3515 अशी संख्या आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahaji Patil: काय झाडी काय डोंगर.. डायलॉग फेम आमदार शिवसेनेत कसे आले? शहाजी पाटलांनीच केला खुलासा

Weather Forecast: उन्हाच्या झळांपासून मिळणार दिलासा; विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता

Rashi Surya Gochar: ९ दिवसांनंतर सूर्यासारखे चमकेल 'या' ६ राशींच्या लोकांचे भाग्य

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SCROLL FOR NEXT