Railway Ticket News Saam Tv
मुंबई/पुणे

Railway Ticket : रेल्वे प्रवासावेळी मोबाइलमधील तिकीट चालेल की नाही? रेल्वेने एका झटक्यात स्पष्ट केले, वाचा सविस्तर

Railway Ticket News : AIच्या मदतीने बनावट रेल्वे तिकिटांचे प्रकार समोर येत असतानाच प्रिंटेड तिकीट अनिवार्य असल्याच्या अफवांवर रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे. मोबाईलवर तिकीट दाखवणे वैध असून AC लोकलसाठी ओळखपत्र आवश्यक आहे.

Alisha Khedekar

  • AIच्या माध्यमातून बनावट रेल्वे तिकिटांचे प्रकार वाढले

  • प्रिंटेड तिकीट अनिवार्य असल्याच्या अफवांना रेल्वेचा नकार

  • मोबाईलवर तिकीट दाखवणे वैध असल्याचे स्पष्ट

  • AC लोकलसाठी ओळखपत्र बाळगणे बंधनकारक

  • कल्याण व जयपूर येथे बनावट तिकिटांचे प्रकार उघड

रेल्वे तिकिटांबाबत फसवणुकीचे अनेक प्रकार सध्या समोर येत आहेत. एआयचा वापर करून अनेक प्रवासी बनावट तिकिटांच्या साहाय्याने लोकलमधून प्रवास करतात. काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकात एका सुशिक्षित जोडप्याने AI च्या माध्यमातून बनावट पास वापरून लोकलमधून प्रवास केल्याचा प्रकार उघडकीस आला. अशा अनेक प्रकरणांची पोल खोल होत आहे. दरम्यान या प्रकरणी रेल्वेने ठोस पाऊल उचलत प्रिंटेड तिकिटच अनिवार्य असल्याचं अनेक चर्चा होत्या. या अफवांना वेळीच लगाम बसावा म्हणून रेल्वेने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

रेल्वेने म्हटले आहे की, बनावट तिकिटांचे अनेक प्रकार जरी समोर येत असले, तरी आम्ही प्रिंटेड तिकिटच अनिवार्य असल्याचं कोणतीही घोषणा केली नाही. फक्त मोबाईल स्क्रीनवर तिकीट दाखवणे पुरेसे आहे. मात्र एसी लोकलने प्रवास करत असाल तर तुम्हाला तुमच्या तिकिटासोबतच तुमचे ओळखपत्र म्हणजेच आधारकार्ड, पॅनकार्ड सोबत ठेवणे गरजेचे आहे. ओळखपत्र सोबत नसेल तर तिकीट ग्राह्य धरण्यात येणार नाही.

कल्याण सारखचं एक प्रकरण जयपूरमध्ये देखील उघडं झालं. काही विद्यार्थी ट्रेनमधून प्रवास करत होते. हे ७ विद्यार्थी एकाच तिकिटावर प्रवास करत होते. त्यांच्याकडे असलेली तिकीट देखील बनावट स्वरूपाची होती. तिकिटांवरील नाव आणि रेल्वेच्या तपशीलवारील नाव यात तफावत आढळल्याने टीसीला संशय आला. या संशयावरून टीसीने तिकीट तपासणी केली असता हा प्रकार समोर आला. ओरिजनल तिकिटासारखंच या विद्यार्थ्यांनी तिकीट AI च्या माध्यमातून तयार केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट, 2100 नाहीतर 4500 मिळणार|VIDEO

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये EVM आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयडी कार्ड, शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

Anushka Sharma Looks Like: 'वहिनीपेक्षा ही क्युट...'; पाकिस्तानी तरुणी दिसते सेम अनुष्कासारखी, व्हिडिओ पाहून विराटला केलं टॅग

Pune : ठाकरे, पवारांची एकमेकांवर टीका जेवायला मात्र एकत्र असायचे, पण आता...तावडेंनी बोलून दाखवली खंत

Pune Politics: पुण्यात शिंदेगटाला मोठं खिंडार, नाराज पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

SCROLL FOR NEXT