गिरीश कांबळे| मुंबई, ता. २६ जुलै २०२४
कालपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई, पुणे, रायगड कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचे थैमान पाहायला मिळत असून आजही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे आज मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एक्सप्रेस ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी, कालच्या पावसानंतर राज्यात आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई-पुणे दरम्यान धावणारी (१२१२७) इंटरसिटी एक्सप्रेस, (१२१२४) डेक्कन क्वीन आणि (१२१२६) प्रगती एक्स्प्रेस या तीन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
गाड्या रद्द केल्याने प्रवाशांची ऐनवेळी गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांना माहिती देण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात रेल्वेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.प्रवाशांना पर्यायी गाड्यांची माहिती देण्याची व्यवस्था या कक्षाच्या माध्यमातून केली जात आहे
दरम्यान, मुंबईत रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र पाऊस जरी नसला तरी रेल्वे वाहतूक उशिराने होत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील गाड्या १० ते १५ मिनिटं उशिराने तर पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या ५ मिनिटे उशिराने धावत आहेत. हार्बर लाईनवर कोणताही परिणाम नाही नसून हार्बर लाईन मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.