Indian Railway  Saam Digital
मुंबई/पुणे

Indian Railway : रेल्वे प्रवास सुरू असतानाही मिळणार तुमच्या आवडत्या हॉटेल्समधील गरमागरम जेवण , कसं ते जाणून घ्या?

Indian Railway : रेल्वे प्रवास सुरू असतानाच आता प्रवाशांना हॉटेलमधून ताजे आणि गरमागरम जेवण मागवता येणार आहे. यासाठी ‘आयआरसीटीसी’ने नुकताच ‘स्विगी’ या कंपनीसोबत करार केला आहे.

Sandeep Gawade

Indian Railway

रेल्वे प्रवास सुरू असतानाच आता प्रवाशांना हॉटेलमधून ताजे आणि गरमागरम जेवण मागवता येणार आहे. यासाठी ‘आयआरसीटीसी’ने नुकताच ‘स्विगी’ या कंपनीसोबत करार केला आहे. त्यामुळे मुंबई, पुणे आणि नागपूरसाठी ही सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली.

मेल-एक्स्प्रेस रेल्वे गाड्यात चवदार आणि गरमागरम जेवण उपलब्ध करुन देण्यासाठी आयआरसीटीसी सातत्याने काम करत आहे. याकरीता आयआरसीटीसीने ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप ‘स्विगी’सोबत करार केला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना फलाटावरचे किंवा पॅन्ट्री कारमध्ये तयार केलेले अन्न खाण्याची आवश्यकता नाही. स्विगीच्या माध्यमातून धावत्या रेल्वेत आवडीचे गरमागरम जेवण ते ऑर्डर करू शकतील. सध्या ही सुविधा रेल्वेच्या ए-१ आणि ए-२ श्रेणीच्या स्थानकांवर उपलब्ध असेल. देशभरात या श्रेणीतील ३५० हून अधिक स्थानके आहेत. बेंगळुरू, भुवनेश्वर, विजयवाडा आणि विशाखापट्टणम या चार स्थानकांवरून याची सुरुवात होईल. पुढच्या सहा महिन्यांत ६० रेल्वे स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध होईल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईत लवकरच सेवेला सुरुवात

रेल्वेच्या ए-१ श्रेणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल टर्मिनस, वांद्रे टर्मिनस सारख्या रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. या ठिकाणांवरून दररोज ५० पेक्षा जास्त मेल-एक्स्प्रेस गाड्या सुटतात. सध्या मुंबई आणि राज्यातील महत्वाच्या स्थानकांवर ही सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्विगीद्वारे रेल्वे स्थानकाजवळच्या हॉटेलची यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

असे करा प्री-ऑर्डर

- जेवणाच्या प्री-ऑर्डरसाठी आयआरसीटीसी ॲपवर लॉगीन करा.

- पीएनआर नंबर टाका

- ऑर्डर कुठल्या स्थानकावर पाहिजे ते निवडा

- स्विगीवरच्या यादीतील रेस्टारंट निवडा

- स्थानक आल्यावर तुमच्या सिटवर जेवणाची डिलिव्हरी होईल.

इन्सुलेटेड बॅगमध्ये जेवण

रेल्वे प्रवाशांना दिले जाणारे अन्न गरम आणि ताजे ठेवण्यासाठी इन्सुलेटेड स्विगी बॅगमध्ये पॅक केले जाईल. स्विगीचा डिलिव्हरी पार्टनर त्या स्थानकावरील फलाटावर पोहोचेल. ग्राहकाला अन्न सुपूर्द करेल आणि रिसिप्ट घेईल. रेल्वेत डिलिवरी करणाऱ्यांना स्विगी आणि आयआरसीटीसीच्या संयुक्त विद्यमाने विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray vs Shinde : शिवसेना कुणाची? पक्ष आणि चिन्हाचा आज लागणार निकाल

Maharashtra Live News Update : नवी मुंबई विमानतळ अन् मुंबई मेट्रो-३ चे उद्घाटन

Navi Mumbai Airport : नवी मुंबई, नवं उड्डाण! पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज विमानतळाचे लोकार्पण

Zodiac Signs Today: बुधाचा उच्चस्थानी योग, सूर्य-चंद्राचा संयोग; या ४ राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास

Gold Rate : सोनं प्रति तोळा ७७ हजारांवर येणार, धक्कादायक कारण आलं समोर, वाचा...

SCROLL FOR NEXT