UN Meeting  Saam TV
मुंबई/पुणे

पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाईचा पर्दाफाश, भारताने संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ऐकवली 26/11 हल्ल्यातील ऑडिओ क्लिप

ऑडिओ क्लिपमध्ये आदेश देणारा पाकिस्तान दहशतवादी आणि 26/11 हल्ल्यातील एक मास्टरमाईंड साजिद मीर होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकादा पाकिस्तानाच्या दहशतवादाचा पर्दाफाश केला आहे. मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यात (Terrorist Attack) पाकिस्तानचं कनेक्शन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेसमोर मांडलं. मुंबईत घुसलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानातून सूचना दिल्या जात होत्या. जिथे हालचाल दिसेल, जिथे गर्दी दिसेल तिथे गोळीबार करा असे आदेश त्यांचा म्होरक्या पाकिस्तानातून देत होता. भारताने याबाबतचे पुरावे सादर करताना एक ऑडिओ क्लिप संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत समोर ठेवली.

ऑडिओ क्लिपमध्ये आदेश देणारा पाकिस्तान दहशतवादी आणि 26/11 हल्ल्यातील एक मास्टरमाईंड साजिद मीर होता. साजिद दहशतवाद्यांना फोनवर दहशतवाद्यांना निर्देश देत होता. जिकडे हालचाल, जिकडे लोक दिसतील तिथे गोळी करण्याच्या सूचना दहशतवाद्यांना दिल्या जात होत्या. (National News)

भारताने ही ऑडिओ क्लिप परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडली आणि पाकिस्तानचा पर्दाफाश केला. या ऑडिओमध्ये दहशतवादी साजिद मीरला मुंबईतील नरिमन हाऊसमध्ये उपस्थित दहशतवाद्यांना सूचना देत आहे. जिथे तुम्हाला हालचाल दिसत आहे, कोणीतरी टेरेसवर चालत आहे, त्याच्यावर गोळीबार करत राहा.

भारताने या बैठकीत सांगितले की, दहशतवादी साजिद मीरचा आणखी अनेक आंतरराष्ट्रीय दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आहे. हा दहशतवादी लश्कर ए तोयबाच्या डेन्मार्क प्रोजेक्टचा मास्टरमाईंड होता आणि त्याला कोपनहेगनमधील एका वृत्तपत्राच्या संपादकाला लक्ष्य करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. पण ही योजना उघड झाली. नंतर साजिद मीरला मृत घोषित करण्यात आले. जगाच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी त्याची डीएनए चाचणीही करण्यात आली. नंतर साजिद मीर जिवंत असल्याचं समोर आलं. नंतर आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे पाकिस्तानने त्यांना अटक केली आणि त्याला शिक्षाही झाली. भारताच्या म्हणण्यानुसार, साजिद मीरला संयुक्त राष्ट्राने दहशतवादी घोषित करण्याची प्रक्रिया अद्यापही रखडलेली आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं की, 26/11 चा हल्ला केवळ मुंबईवरच नाही तर आंतरराष्ट्रीय समुदायावर झाला होता. हल्ल्यातील दोषींना शिक्षा देण्याचे काम सुरू असले तरी ते आव्हान अद्याप पूर्ण झालेले नाही. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जेम्स क्लेवरली, घानाचे परराष्ट्र मंत्री, UAE चे गृहमंत्री आणि इतर देशांचे प्रतिनिधी देखील या बैठकीला उपस्थित आहेत.

26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री पाकिस्तानातील लश्कर-ए-तोयबाच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी आणि इमारतींवर हल्ला केला होता. भारताला या दहशतवादी हल्ल्याचा बिमोड करण्यासाठी चार दिवस लागले. या हल्ल्यात 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. अजमल कसाब वगळता सर्व 9 दहशतवादी मारले गेले होते. दहशतवाद्यांनी मुंबईतील दोन पंचतारांकित हॉटेल्स, रेल्वे स्टेशन आणि नरिमन लक्ष्य केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

SCROLL FOR NEXT