पुणे: १९७१ च्या भारत - पाकिस्तान (IND PAK War) युद्धात भारताने पाकिस्तानचा ऐतिहासिक पराभव करून स्वत्रंत्र बांगलादेशाची निर्मिती केली. या युद्धाला आता ५० वर्ष पूर्ण झाली असून, या युद्धातील हुतात्म्यांच्या स्मृतीत देश सध्या स्वर्णीम विजय वर्ष साजरा करत आहे. या स्वर्णीम विजय वर्षाची मशाल पिंपरी - चिंचवड शहरात देखील दाखल झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरात स्वर्णीम विजय मशालीच पिंपरी - चिंचवडकरांनी ढोलताशाच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेत जंगी स्वागत केलंय. रहाटणी येथील एस एन बी पी स्कुल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या समारंभात स्वर्णीम मशालीच विद्यार्थी आणि पिंपरी चिंचवडकरांनी जंगी स्वागत केलं आहे. या समारंभाला पिंपरी - चिंचवड शहरात रहाणारे लष्करातील तिन्ही दलाचे माजी सैन्य अधिकारी देखिल उपस्थित होते.
यावेळी एस एन बी पी शाळेतील विद्याथ्यांनी १९७१ च्य्या युद्धातील आठवणींना उजाळा देणारे काही अविस्मरणीय आठवणीचे क्षण आपल्या नृत्य आणि नाट्य कलेतून लष्करी अधिकाऱ्या समोर सादर केल. या विद्यार्थ्यांचं देशप्रेम, उत्साह आणि कलागुण पाहून आम्ही आमच्या देशाच्या पुढील भविष्यासाठी आश्वस्थ आहोत. उद्या यांच्यातील बरेचसे विद्यार्थी सैन्यात दाखल होऊन देश सेवा करतील असा विश्वास यावेळी सदन कमांडचे चीफ कमांडंट मेजर जनरल अनुप जाखड यांनी व्यक्त केलं.
एस एन बी पी शाळे स्वर्णीम विजय वर्षाची मशालाची स्वागत करण्याची संधी मिळणे हे आमच्यासाठी अत्यंत सौभाग्याची गोष्ट आहे. यामुळे समारंभा मुळे आमच्या विद्यार्थ्यांन मध्ये देखील देश सेवा करण्याची भावना दृढ होईल असा विश्वास एस एन बी पी शाळेचे संचालक डी के भोसले यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केल. यावेळी 1971 च्या युध्दात हौतात्म्य आलेल्या शहिदाना आदरांजली वाहून या समारंभाची सांगता करण्यात आली.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.