PM Modi Pune Visit Saam Tv
मुंबई/पुणे

PM Modi Pune Visit: पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याला 'India' फ्रंटचा विरोध, काळे झेंडे दाखवून करणार निषेध

Pune Latest News: पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याला 'India' फ्रंटचा विरोध, काळे झेंडे दाखवून करणार निषेध

साम टिव्ही ब्युरो

>> ज्ञानेश्वर चौतमल

PM Modi Pune Visit: लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने पंतप्रधान मोदी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात येणार आहे. त्यांच्या या दौऱ्याला आता इंडिया फ्रंटने आपला विरोध दर्शवला आहे.

इंडिया फ्रंटने दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याचा १ तारखेला सकाळी ११ वाजता अलका चौकात काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार आहे. तसेच पुणेकरांनी काळे कपडे घालून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन इंडिया फ्रंटच्या वतीने करण्यात आलं आहे.

याबाबत माहिती देताना काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी सांगितलं की, मोदींविरोधातील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची एकत्र पत्रकार परिषद केली जाणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनता दल समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष आणि आम आदमी पक्ष सामील होणार आहे.  (Latest Marathi News)

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी मणिपूरमध्ये (Manipur Violence) जाऊन परिस्थिती पाहावी आणि चर्चा करावी, अशी मागणी विरोधी पक्षांच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे.

असा असेल दौरा...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यामध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रम आणि विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच यावेळी पंतप्रधान मोदी हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ‘श्रीं’च्या मूर्तीला अभिषेक करणार आहेत. त्यानंतर लोहगाव विमानतळावरून पंतप्रधान मोदी दिल्लीकडे प्रयाण करणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीडमध्ये पुन्हा अपहरणाचा थरार; दिवसाढवळ्या तरुणाला कारमध्ये बसवून पळवलं, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Maharashtra News Live Update: परळीत दिवसाढवळ्या अपहरण

Push-Ups Fitness Test: तुमच्या वयानुसार किती पुश-अप्स मारले पाहिजेत? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती, वाचा

Anil Kapoor Daughter: अनिल कपूरच्या लेकीला मोठा धक्का; कोट्यवधींचे हिऱ्यांचे कानातले चोरीला, सिनेसृष्टीत खळबळ!

Hardik pandya trade: आधी हार्दिकला घेतलं आता यशस्वीवर डाव खेळणार? MI-RR मध्ये मोठ्या ट्रेडची चर्चा

SCROLL FOR NEXT