Maha Vikas Aghadi Meeting Saam Tv
मुंबई/पुणे

India Alliance News: सप्टेंबरमध्ये 'इंडिया'ची बैठक मुंबईत होणार, नाना पटोले यांनी दिली माहिती

Maha Vikas Aghadi Meeting: सप्टेंबरमध्ये 'इंडिया'ची बैठक मुंबईत होणार, नाना पटोले यांनी दिली माहिती

साम टिव्ही ब्युरो

India Alliance News: देशपातळीवर विरोधी पक्षांची मजबूत एकजूट झालेली असून इंडिया या नावाने ही आघाडी ओळखली जाते. इंडियाची तिसरी बैठक मुंबईत होणार असून या बैठकीच्या तयारीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. मुंबईतील बैठकीसंदर्भात शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. मुंबईतील बैठकीसाठी तयारी सुरु असून काँग्रेस पक्ष या बैठकीसाठी सज्ज आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यंनी दिली.

महाविकास आघाडीची आज बैठक पार पडली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते नाना पटोले म्हणाले की, या बैठकीत शरद पवार यांनी बंगळुरू आणि पाटणा येथे झालेल्या बैठकीचा आपला अनुभव सांगितला. मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीत योग्य नियोजन कसं करता येईल, याच मार्गदर्शन त्यांनी (शरद पवार यांनी) केलं.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, शशिकांत शिंदे, संग्राम थोपटे, रोहित पवार सुनिल भुसारा आदी उपस्थित होते. (Latest Marathi News)

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, इंडियाची पहिली बैठक पाटण्यात झाली तर दुसरी बैठक बेंगलुरु येथे नुकतीच पार पडली. या दोन्ही बैठकांना शरद पवार उपस्थित होते. तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीला देशभरातून जवळपास १०० महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

यात काही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, विविध पक्षांचे वरिष्ठ नेते असणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी शरद पवार यांनी फोनवरून चर्चा केली. मुंबईत होणारी इंडियाची बैठक यशस्वी करण्यावर महाविकास आघाडी म्हणून आमचा सर्वांचा भर आहे.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी मजबूत आहे. पावसामुळे मविआच्या सभा थांबलेल्या आहेत. पावसाळा संपताच या सभा पुन्हा सुरु होणार आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षही राज्यभर सभा घेणार आहे. या बैठकीत जागा वाटपासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसंदर्भात चार -पाच बैठका घेतलेल्या आहेत. तीन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा होईल तेव्हा जागा वाटप व उमेदवार निश्चित करण्यावर चर्चा होईल, असेही नाना पटोले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ये मेरा दिल प्यार का दिवाना... अतिवृष्टीमुळे बळीराजा टाहो फोडत असताना शिंदेसेनेने भरवला गौतमी पाटीलचा कार्यक्रम, VIDEO

Maharashtra Live News Update: अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान

Sugar Cravings: सतत मूड स्विंग्स, ताण अन् थकवा? मग आत्ताच हा १ पदार्थ सोडा

Dombivali News : डोंबिवली हादरली; मुख्याध्यापकाचे ७ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; ६ वर्षांपूर्वीही केलं होतं असंच कृत्य, पण...

Anganwadi Teacher: अंगणवाडी शिक्षिका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी! सेवासमाप्तीची वयोमर्यादा वाढली

SCROLL FOR NEXT