Ajit Pawar vs Sharad Pawar News Saam TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar VS Ajit Pawar : सकाळी शरद पवारांसोबत असलेल्या आमदाराचा यू टर्न; अजित पवारांची भेट घेत जाहीर केला पाठिंबा

Political news : देवेंद्र भुयार अजित पवारांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीन मानले जातात.

Rashmi Puranik

Mumbai News : शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थित असलेले अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी काही तासातच यू टर्न घेतला आहे. देवेंद्र भुयार सकाळी शरद पवारांना वायबी चव्हाण येथे बोलवलेल्या बैठकीला हजर होते. या बैठकीत उपस्थित असल्याने त्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिल्याची चर्चा होती.

मात्र काही तासातच देवेंद्र भुयार यांनी अजित पवार यांची भेट घेऊन अभिनंदन केले व आपला पाठिंबा त्यांना जाहीर केला आहे. देवेंद्र भुयार अजित पवारांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीन मानले जातात. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी जवळपास 40 आमदार अजित पवारांसोबत असल्याची दावा केला जात आहे. तसाच दावा करत अजित पवारांना शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. 2 जुलै रोजी अजित पवार यांना राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादीच्या 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतील.

अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष

शरद पवार  यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून २०२२ मध्ये झालेली नेमणूक ग्राह्य धरता येणार नाही. कारण तेव्हा झालेल्या राष्ट्रीय बैठकीचेपुरावे अस्तित्वात नाही. तसेच कोणीही या बैठकीला उपस्थित नव्हते आणि याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच राष्ट्रीय अध्यक्षपदी अजित पवार यांची नेमणूक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stray Dog Attack : भटक्या कुत्र्यांची दहशत कधी थांबणार? संभाजीनगरमध्ये चिमुरड्याचे लचके तोडले अन्...

Maharashtra Weather: राज्यावर अवकाळीचं संकट! ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज, ११ जिल्ह्यांना इशारा; बळीराजा चिंतेत

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात दाखल

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? संभाव्य तारीख आली समोर

Kadhi Pakoda Recipe : कढी पकोडा संडे स्पेशल मेन्यू; 'ही' रेसिपी फॉलो करा कढी अजिबात फुटणार नाही

SCROLL FOR NEXT