मंगशे कचरे
इंदापूर: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत 'उठाव' केल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. भाजप आणि शिंदे गट एकत्र आले आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर राज्यात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा संघर्ष सुरूच आहे. शिवसेना आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटात इनकमिंग आणि आउटगोइंग सुरूच आहे.
राज्यभरातून काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदेंना, (Eknath Shinde) तर काही कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत आहेत. पण इंदापूरमधील एका शिक्षकाने शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी तडकाफडकी नोकरीचा राजीनामा दिला आहे. या शिक्षकाच्या राजीनाम्याचं पत्र आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Indapur Primary teacher resigned support for Shiv Sena Uddhav Thackeray Resignation letter goes Viral)
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील अनेक जुने-जाणते शिवसैनिक, पदाधिकारी आणि तालुका पातळीवरील त्या-त्या ठिकाणचे नेते पुढे येत आहेत. माजी मंत्री आदित्य ठाकरे हे देखील दुसऱ्या बाजूने राज्यभर दौरा करून शिवसैनिकांना एकजुटीचं आवाहन करत आहेत. एकीकडे पदाधिकारी, कार्यकर्ते पाठिंबा देत असतानाच, एका शिक्षकानं उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी चक्क नोकरी सोडली आहे. त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
दीपक पोपट खरात असे राजीनामा दिलेल्या शिक्षकाचं नाव आहे. त्यांच्या राजीनाम्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवसेना या पक्ष-संघटनेचे पूर्णवेळ काम करण्यासाटी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असा उल्लेख खरात यांच्या व्हायरल झालेल्या पत्रात आहे.
खरात हे वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित संस्थेच्या प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत होते. गेली वीस वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून ते नोकरी करत आहेत. उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी नोकरी सोडल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. शिवसेनेचे पूर्णवेळ काम करण्याचा मानस आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
Edited By - Nandkumar Joshi
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.