Indapur Firing Saam tv
मुंबई/पुणे

Indapur Firing : इंदापूर पुन्हा हादरलं; भरचौकात अज्ञात व्यक्तीचा तरुणावर गोळीबार, VIDEO

pune Indapur Firing News : इंदापूर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरून गेलं आहे.भरचौकात अज्ञात व्यक्तीने तरुणावर गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे.

मंगेश कचरे

Indapur Firing News : इंदापूर शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरलं आहे. इंदापूर शहरात अज्ञाताने एका तरुणावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या एकाने केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. या जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.

दुचाकीवरून आलेल्या एकाने गोळीबार केल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात तरुण जखमी झालाय. गोळीबारानंतर घटनास्थळी काही लोक जमा झाले. त्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले. या अज्ञाताने तरुणावर गोळीबार का केला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडलीये.

नेमकं काय घडलं?

बारामतीमधील तरुणाच्या हत्येची घटना ताजी असतानाच इंदापुरात अज्ञाताने एकावर गोळीबार केलाय. या गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. राहुल चव्हाण असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नांव आहे. तो इंदापूर तालुक्यातील शिरसोडी गावचा असल्याची माहिती मिळतेय. त्याला तीन राउंड लागले असल्याची ही माहिती मिळत आहे.

घटना घडताच इंदापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या गोळीबारातील जखमीला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एक अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आली. त्यानं तीन ते चार राऊंड फायर केले त्यापैकी तीन राऊंड समोरील व्यक्तीला लागले आणि यात समोरील व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत असून इंदापूर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. ज्याच्यावर गोळीबार झाला, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

SCROLL FOR NEXT