Sharad Pawar Vs Ajit Pawar Saam Digital
मुंबई/पुणे

Indapur News : इंदापुरात शरद पवार आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा; तंटामुक्ती अध्यक्षाला बेदम मारहाण

Indapur political News : इंदापुरात शरद पवार आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मंगेश कचरे

बारामती : इंदापुरात विधानसभा निवडणुकीचं मतदान सुरु असताना मोठा राडा झाला. इंदापूरच्या लाखेवाडीत मोठा राडा झाला आहे. या राड्यात लाखेवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्षाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. यानंतर तंटामुक्तीचे अध्यक्ष बबन खाडे यांनी पोलिसांत धाव घेतली आहे.

इंदापुरात तंटामुक्तीचे बबन खाडे यांनाच मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या राड्यानंतर बबन खाडे यांनी इंदापूर पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. बबन खाडे यांनी किरकोळ जखमी झाली आहे.

नेमकं काय घडलं?

इंदापूर तालुक्यातील लाखेवाडीत अजित पवार गट आणि शरद पवार गटात वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या गावच्या तंतामुक्ती अध्यक्षाला मारहाण झाल्याची तक्रार इंदापूर पोलिसात दाखल करण्यात आली आहे.

प्रभाकर खाडे,संतोष प्रभाकर खाडे, शुक्रराक संतोष खाडे,धनराज प्रदीप खाडे यांनी दमदाटी करुन मारहाण केल्याची तक्रार लाखेवाडीचे तंटामुक्ती अध्यक्ष बबन रामचंद्र खाडे यांनी इंदापूर पोलिसात दाखल केली आहे. या घटनेत तंटामुक्ती अध्यक्ष बबन खाडे किरकोळ जखमी झाले आहेत.

नागपूरमध्येही पैसे वाटप असल्याचा आरोप

नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात परिसरात तणाव झाल्याची घटना घडली आहे. काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्या शेळके यांच्या प्रचार कार्यालयात काही लोक लिफाफे घेऊन पैसे वाटत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. हे पैसे मतदारांना वाटण्यासाठी आणले असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या आरोपानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

घटनास्थळी निवडणूक विभागाचे काही अधिकारी आणि त्यांनी काही लोकांना सोबत घेऊन गेले. मात्र, काँग्रेसने आरोप फेटाळला आहे. भाजपने निवडणूक विभागाच्या माध्यमातून कारवाई करायची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT