Yashwant Jadhav Saam Tv
मुंबई/पुणे

यशवंत जाधव यांच्या अडचणीत वाढ; इन्कम टॅक्सनंतर आता ईडीकडून होणार चौकशी

ईडीकडून आता यशवंत जाधवांच्या परदेशातील गुंतवणुकींची चौकशी होण्याची शक्यता आहे.

सुरज सावंत

मुंबई - शिवसेनेचे (Shivsena) नेते यशवंत जाधव यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारी करण्यात आल्यानंतर आता यशवंत जाधव यांना ईडीकडून (ED) समन्स बजावण्यात आले आहे. यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांना फेमा अंतर्गत ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. ईडीकडून आता यशवंत जाधवांच्या परदेशातील गुंतवणुकींची चौकशी होण्याची शक्यता आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान याआधी जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या छापेमारीत २ कोटी रोख, लॅपटॉप, तसेच काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली होती. सुमारे दोन दिवस चाललेल्या या चौकशीत आयकर विभागाला महत्त्वाची माहिती मिळाली होती. इन्कम टॅक्स विभागाच्या चौकशीनंतर आता यशवंत जाधव यांच्यावर ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचाही गंभीर आरोपही सोमय्या यांनी जाधव यांच्यावर केला होता. त्यानंतर आयकर खात्याने जाधव यांच्या घरावर छापा मारत संबंधित 41 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. आयकर खात्याकडून जाधव यांचे भायखळ्यातील 31 फ्लॅट्स आणि वांद्रेतील 5 कोटींचा फ्लॅट जप्त करण्यात आला होता.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TMC Spilt : ममता बॅनर्जींचे २० खासदार 'नॉट रीचेबल'; भाजप मुख्यमंत्र्यांसोबत दिल्लीत गुप्त बैठक, महाराष्ट्रासारखा पक्ष फुटणार?

Empty Stomach Fruits: रिकाम्या पोटी ही फळं चुकूनही खाऊ नयेत

Hair Care: केसगळती, कोंडा आणि ड्रेयनेसला म्हणा बाय-बाय! फक्त या सवयींनी मिळतील हेल्दी केस

Maharashtra News Live Update: पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

Silver Price Today: सोन्यानंतर चांदीच्या किंमतीतही मोठी घसरण, वाचा ताजे दर

SCROLL FOR NEXT