Anil Parab Saam TV
मुंबई/पुणे

Anil Parab: अनिल परब यांच्या CA च्या घरी आयकर विभागाची छापेमारी

परब यांच्याशी संबंधित अधिकारी बजरंग खरमाटेंच्या (Bajrang Kharmate) यांच्या घरी देखील आयकरने छापेमारी केली आहे.

सुरज सावंत

मंबई : आज सकाळी युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारली. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचे निकटवर्तीय तसंच परिवहन अधिकारी शिवसैनिक संजय कदम (Sanjay Kadam) यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारली असतानाच आताअनिल परब यांचे CA व्हि एस परब यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापेमारी सुरु केली आहे.

मुंबईील वांद्रे एमआयजी परिसरातील एलिट इमारतीत ही छापेमारी सुरु आहे. दरम्यान मंत्री परब यांच्याशी संबंधित अधिकारी बजरंग खरमाटेंच्या (Bajrang Kharmate) यांच्या घरी देखील आयकरने छापेमारी केली असून ही सर्व छापेमारी राजकीय हेतूने केली जात असल्याचं सत्ताधारी म्हणत आहेत. मागील वेळेसही शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी देखील अशाच प्रकारे धाडी पडल्या आणि त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचे सेनेकडून सांगितलं जात आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT