sanjay raut Saam Tv
मुंबई/पुणे

प्रत्येक गाेष्टीची नाेंद हाेतेय, अपना टाईम भी आयेगा : संजय राऊत

जयश्री मोरे

मुंबई : दसरा मेळावा हा नेहमीच्या पद्धतीने होईल. हा देखील महाराष्ट्राचा सांस्कृतिक उत्सव आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील ठरवलेला आहे. आम्ही देखील तशी तयारी करत आहोत. हा मेळावा त्याच जाेशात हाेईल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी नमूद केले. income-tax-ajit-pawar-sanjay-raut-bmc-election-shivsena-maharashtra-latest-news-sml80

राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले दसरा मेळावा होणारच. आता हळूहळू कालपासून मंदिरे उघडली आहे. नियम पाळून सण साजरे होत आहेत. दसरा मेळावा जाेशात होईल पण कुठे होणार हे आता सांगू शकत नाही.

मुंबई सेनेलाच जास्त जागा मिळतील

शिवसेनेची कायम भूमिका आहे की मुंबईत पक्षाचा विस्तार व्हावा. यापुर्वी देखील मुंबई शिवसेना स्वबळावरच लढत आहे. यंदा आम्ही स्वबळावर लढणार आहाेत अर्थातच महाविकास आघाडीच आहे. शिवसेना मोठा पक्ष म्हणून शंभरीच्यावर जागा मिळाव्यात यासाठी नक्कीच आम्ही तयारी करीत आहाेत. मुंबईवर भगवा फडकणार, पाच वर्षांपूर्वी देखील आमच्या ताकदीवर आम्ही लढलाे आहाेत.

ही राजकीय छापेमारी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे धाड सुरु आहे या विषयावर खासदार राऊत म्हणाले ही राजकीय छापेमारी आहे. ईडी, आयकर, सीबीआय यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात छापेमारी सुरु आहे. हे सुडाचे राजकारण आहे. यातून आम्ही देखील भरडले गेलाे आहाेत. उद्या काय होईल सांगता येत नाही. अजित पवार यांच्यावर राजकीय राग असू शकतो. काही कारणांनी केंद्राचा अथवा भाजपचा. परंतु ज्या पद्धतीने त्यांच्या निकटवर्तीयांना टार्गेट केले जात आहे. एखाद्या कुटुंबावर ते देखील राजकीय कुटुंबावर अशाप्रकारे दहशत निर्माण करणारी छापेमारी सुरू. महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांवर अशा पद्धतीने टार्गेट केले जात आहे.

अपना टाईम भी आयेगा

जरंडेश्वरचा व्यवहार हा न्यायालयाच्या निर्णयाने झाला आहे हे सर्वांनाच माहित आहे. अनेकांचे कायदेशिर व्यवहार असून देखील केवळ शिवसेना, राष्ट्रवादी, काॅंग्रेसच्या नेत्यांवर दबाब आणायचा आणि त्रास द्यायचा हेच काम सध्या सुरु आहे. या प्रत्येक गाेष्टीची नाेंद हाेत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार यांनी देखील हेच सांगितले आहे लाेकांनी विचार करावा काय सुरु आहे. दरम्यान हेही दिवस निघून जातील. दिल्लीत आमचे ही दिवस येतील. ज्या सूडाने ज्या संस्था वागताहेत त्यांनी लक्षात घ्यावे अपना टाईम भी आयेगा असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

दरम्यान संपूर्ण सोशल मीडियाचा वापर द्वेषाचा आणि सूडाच्या राजकारण करण्यासाठी वापरला जात आहे. आपल्या राजकीय विरोधकांची बदनामी करण्यासाठी केला जात आहे. जर कोणी आंतरराष्ट्रीय मंचावर आवाज उठवला असेल तर त्याचे समर्थन व्हायला हवं असेही राऊत यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health: घसादुखीमुळे होऊ शकतात ५ धोकादायक आजार, चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

ITBP Recruitment: १२ वी पास तरुणांना ITBP मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, महिना ९२००० रुपये पगार, अर्ज कसा करावा?

Astro Tips: हातात घड्याळ घालताय? या चुका टाळा अन्यथा...

'ये तुम्हारे कर्मों का फल है...'चाहत अन् रजतमध्ये कडाक्याचे भांडण 'Bigg Boss' मध्ये मोठा ड्रामा, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: मुंबईच्या पोलिस नियंत्रण कक्षाला बाॅम्ब ठेवल्यााबाबत धमकीचा फोन

SCROLL FOR NEXT