Shirdi Sai Mandir News Saam Tv
मुंबई/पुणे

Shirdi Sai Baba Darshan : बहुचर्चित दर्शन रांगेचे लोकार्पण हाेणार, शिर्डीच्या आमदारांनी काढला मुहूर्त

दर्शनरांग खूली झाल्यास साई भक्तांची भटकंती थांबेल अशी चर्चा सुरु आहे.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Shirdi News : शिर्डी येथे भाविकांसाठी उभारण्यात आलेली दर्शन रांगेचे दसऱ्याच्या मुहूर्तावर (dasara 2023) लाेकापर्ण केले जाणार आहे. भाविकांच्या साेयीसाठी दर्शन रांगी खुली केली जात असल्याची माहिती शिर्डीचे आमदार राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली. (Maharashtra News)

साईभक्तांचे दर्शन अधिक सुकर व्हावे यासाठी कोट्यावधी रूपये खर्च करून उभारण्यात आलेले अत्याधुनिक दर्शन रांग काॅप्लेक्स उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. एक वर्षभरापूर्वी या दर्शन काॅम्लेक्सचे काम पूर्ण झाले मात्र उद्घाटनासाठी केवळ प्रधानमंत्र्याची तारीख मिळत नसल्याने उद्घाटन लाल फितीत अडकले.

कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या दर्शनासाठी वर्षाकाठी करोडो तर दररोज सरासरी ५० हजार भाविक शिर्डीत येत असतात. या भाविकांची तासंतास दर्शनरांगेत उभं राहण्यापासून सुटका व्हावी यासाठी जवळपास ११० कोटी रूपये खर्च करून अत्याधुनिक वातानुकूलीन दर्शन काॅम्लेक्स उभारण्यात आले आहे.

ही दर्शन रांग सुरू झाली तर ऊन, वारा, पाऊस यापासून साई भक्तांना दिलासा मिळणार आहे. त्या सोबतच चप्पल - बूट आणि मोबाईल ठेवण्यासाठी रांग लावणे, वाढत्या तापमानात तासंतास दर्शन रांगेत उभे राहणे तसेच मंदिर परिसरात अनवाणी पायाने उन्हात करावी लागणारी साई भक्तांची भटकंती यामुळे थांबणार आहे.

महसूलमंत्र्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर दर्शन रांग सुरू करण्यास अनुकूलता दर्शवली असली तरी न्यायालयाच्या आदेशाने साईबाबा संस्थानचे कामकाज बघणाऱ्या तदर्थ समितीसमोर हा प्रस्ताव मांडला जाणार आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या मान्यतेनंतरच हे दर्शन रांग कॉम्प्लेक्स सुरू होऊ शकते. साई संस्थानची तयारी पूर्ण असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

दरम्यान या दर्शन रांगेवरुन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रधानमंत्र्यांची वेळ मिळाली नाही तर साईभक्तांची गैरसोय होऊ देणार का? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्याना पत्र लिहिले हाेते. या पत्रात दर्शन रांग सुरू करण्याची मागणी देखील करण्यात आली हाेती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh Video : छत्रपतींसमोर नतमस्तक! रितेश देशमुख सकाळी सकाळी पोहचला शिवनेरीवर, म्हणाला...

PM Kisan Yojana: होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹२०००; पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याबाबत अपडेट

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

Election : सरपंच थेट जनतेतूनच ठरणार! सोलापूरमधील ६५५ ग्रामपंचायतीचा धुरळा उडाला, पाहा वेळापात्रक

Panchang Today: आज कुंभ राशीत चंद्र, निर्णयांसाठी अनुकूल दिवस; पाहा आजचे मुहूर्त आणि लकी राशी

SCROLL FOR NEXT