पिंपरी-चिंचवडमध्ये नायलॉन मांजाने कापला दुचाकीस्वाराचा गळा; पडले आठ टाके!
पिंपरी-चिंचवडमध्ये नायलॉन मांजाने कापला दुचाकीस्वाराचा गळा; पडले आठ टाके! SaamTvNews
मुंबई/पुणे

पिंपरी-चिंचवडमध्ये नायलॉन मांजाने कापला दुचाकीस्वाराचा गळा; पडले आठ टाके!

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये पतंगाच्या नायलॉन मांजाने दुचाकीस्वाराचा गळा कापला गेल्याची घटना आज सायंकाळी पावणे सहा च्या सुमारास घडली आहे.  कैलास पवार असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून गंभीर दुखापत होऊन गळ्याला आठ टाके पडले आहेत. तसेच, मांजा बाजूला करताना त्यांची बोट देखील कापली आहेत. खरं तर नायलॉन मांज्यावर (Chinese Manja) बंदी आहे. मात्र, काही दुकानदार सर्रास त्याची विक्री करत आहेत.

हे देखील पहा :

कैलास पवार हे दुचाकीवरून भोसरी (Bhosari) येथून नाशिक फाटा येथील घरी येत होते. तेव्हा, लांडेवाडी येथील चढावरून दुचाकी येत असताना त्यांना गळ्याला काही तरी चावा घेत आहे अस वाटलं. त्यांनी गळ्याला हात लावला, तर गळा रक्तबंबाळ झाला होता. मांजा हाताने बाजूला करण्याचा पर्यंत केला असता हाताची बोटं देखील कापली गेली आहेत. ही घटना सायंकाळी पावणे सहा च्या सुमारास घडली आहे. अशी माहिती कैलास पवार यांनी दिली आहे. पवार हे तातडीने रुग्णालयात (Hospital) गेले तिथे उपचार घेतले असून आठ टाके पडले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, गेल्याच वर्षी एप्रिल महिन्यात पतंगाचा मांजा अडकून गळा चिरल्याने दुचाकीवरील डॉक्‍टर कृपाली निकम या तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नाशिक फाट्यावरील जेआरडी टाटा उड्डाण पुलावर सायंकाळच्या सुमारास घडली होती. तसेच या घटनेमुळे पुन्हा एकदा नायलॉन मांजा हा जीवावर बेतू शकतो हे अधोरेखित झालं आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB Vs GT : आरसीबीच्या बॉलर्ससमोर गुजरात ढेर; बेंगळुरूसमोर १४७ धावांच लक्ष्य

Amruta Khanvilkar : चंद्राच्या घायाळ करणाऱ्या अदा; साडीत अमृताचे क्लासिक फोटोशूट

Special Report : मनसे नेते Avinash Jadhav यांच्या अडचणीत वाढ? जाधवांवर खंडणीचा गुन्हा दाखल

Uddhav Thackeray: १० वर्षापूर्वी चहावर चर्चा केली, आता कामावर चर्चा करा; उद्धव ठाकरेंनी PM मोदी- शहांना केलं लक्ष्य

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे गेल्या १० वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? ; कोकणातून राज ठाकरेंची तोफ धडाधडली

SCROLL FOR NEXT