मुंबईत 'हि' संस्था देणार ३५० गणेश मंडळांना मोफत गणेशमूर्ती जयश्री मोरे
मुंबई/पुणे

मुंबईत 'हि' संस्था देणार ३५० गणेश मंडळांना मोफत गणेशमूर्ती

अंधेरी पूर्वेत मंडळांना मदत म्हणून, जीवन ज्योत प्रतिष्ठानच्या माध्यमातून 350 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणपतीची मूर्ती आणि 11 दिवस लागणारे पूजेचे साहित्य दिले जाणार आहे.

जयश्री मोरे

मुंबई : लॉकडाऊनमध्ये अनेक सामाजिक संस्थांमार्फत विविध पद्धतीने मदतीचा हात सर्वसामान्यांना मिळालेला आपण पहिला आहे. अंधेरीमध्ये एक सामाजिक संस्था अशाच पद्धतीने सामाजिक बांधिलकी जपत आहे. अंधेरीमधील 'जीवन ज्योत' हि सामाजिक संस्था कोरोनाच्या या कठीण काळात अनोखी मदत करत आहे.

हे देखील पहा -

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात दोन वेळा लॉकडाउन करण्यात आला. त्यामुळे सर्वसामान्यांसह सर्वांनाच मोठ्या आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. यावर्षी गणपती मंडळाला वर्गणीसाठी मोठा त्रास सहन करावा लागणार आहे, अंधेरी पूर्वेत मंडळांना मदत म्हणून, जीवन ज्योत प्रतिष्ठानच्या माध्यमातून 350 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणपतीची मूर्ती आणि 11 दिवस लागणारे पूजेचे साहित्य दिले जाणार आहे.

1 ते 4 फुटाच्या गणेशमूर्तींची किंमत 4 हजार ते 18 हजारापर्यंत आहे. या मूर्ती अंधेरीतील च मूर्तीकारांकडून घेऊन जीवन ज्योत ही संस्था ज्या मंडळांनी नोंदणी केली आहे अश्या सार्वजनिक मंडळांना मदतीचा हात म्हणून गणेशमूर्ती मोफत देणार आहे. आत्तापर्यंत जवळपास 180 मंडळांनी नोदणी केली आहे. अश्या प्रकारे मंडळांना मदतीचा हा देऊन सामाजिक बांधिलकी जीवन ज्योत संस्था जपत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT