कल्याण-डोंबिवलीत 4 लाखांहून अधिक मतदारांचे यादीत फोटोच नाहीत
कल्याण-डोंबिवलीत 4 लाखांहून अधिक मतदारांचे यादीत फोटोच नाहीत प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

कल्याण-डोंबिवलीत 4 लाखांहून अधिक मतदारांचे यादीत फोटोच नाहीत

प्रदीप भणगे

कल्याण: केडीएमसी निवडणुकीची तयारी एकीकडे सुरू झाली असतानाच दुसरीकडे कल्याण डोंबिवलीतील तब्बल 4 लाखांहून अधिक मतदारांचे यादीमध्ये छायाचित्रच नसल्याने त्यांच्या मतदानाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातही संबंधित पत्त्यावर राहत नसल्याने त्यातील दिड लाखांहून अधिक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. (In Kalyan-Dombivali, there are no photos in the list of more than 4 lakh voters)

हे देखील पहा -

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कल्याण पश्चिम (4 लाख 78 हजार मतदार), कल्याण पूर्व (3 लाख 57 हजार मतदार), कल्याण ग्रामीण (4 लाख 40 हजार मतदार) आणि डोंबिवली (3 लाख 72 हजार मतदार) असे चार विधानसभा मतदारसंघ मिळून एकूण 16 लाख 49 हजार 270 मतदार आहेत. त्यापैकी कल्याण पश्चिमेत 1 लाख 22 हजार, कल्याण पूर्वेत 92 हजार 192, कल्याण ग्रामीणमध्ये 82 हजार 364 आणि डोंबिवलीत 1 लाख 17 हजार 92 मतदार अशा एकूण 4 लाख 13 हजार मतदारांची यादीत छायाचित्रे नसल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 1 लाख 67 हजार 909 मतदारांची नावे मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर ते राहत नसल्याने वगळण्यात आल्याचे कल्याणचे प्रांताधिकारी विजय भांडे पाटील यांच्याकडून संगण्यात आले.

बोगस मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मतदारांचे फोटो असणे निवडणूक आयोगाकडून बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील मतदार याद्या फोटोंसह अद्ययावत करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. तर आजपर्यंत कल्याण डोंबिवलीतील चारही विधानसभा मतदारसंघ मिळून 4 लाखांपैकी केवळ 7 हजार 770 मतदारांची छायाचित्रे गोळा करण्यात आल्याचेही प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले.

छायाचित्रे नसणाऱ्या मतदारांनी संबंधित बीएलओकडे आपली छायाचित्रे जमा करण्याचे आवाहन करतानाच यादीतील पत्त्यावर मतदार न सापडल्यास ती नावे वगळण्याचा इशाराही प्रांताधिकारी भांडे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे अवघ्या 12 दिवसांत 4 लाख मतदारांची छायाचित्रे गोळा होतात की एवढ्या मोठ्या संख्येने मतदारांची नावे यादीतून वगळली जातात, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashatra Election: ठाण्यात शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं? ठाण्याचा किल्ला राखणं शिंदेंना जड?

West Bengal News: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक छळाचा आरोप; कर्नाटकचे खासदार प्रज्ज्वल रेवन्नाविरोधात लुकआउट नोटीस जारी

Jayant Patil: ... तर पंचाईत होईल, जयंत पाटील यांचा विश्वजित कदम यांना इशारा; नेमकं काय म्हणाले?

Pune Traffic News: पुण्यातील वाहतुकीत ४ मे पासून मोठे बदल; अनेक रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Baramati Lok Sabha: सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीस, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT