Fastag Saam Tv
मुंबई/पुणे

कामाची बातमी! Fastag नसेल तर भरावा लागणार दुप्पट टोल; आजपासून नवे नियम लागू

Fastag Mandatory From Today: आजपासून प्रत्येक कारला फास्टॅग असणे बंधनकारक आहे. जर तुमच्या कारला फास्टॅग नसेल तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे.

Siddhi Hande

वाहनधारकांसाठी मोठी बातमी आहे. आता तुमच्या वाहनांना फास्टॅग लावणे अनिवार्य आहे. जर तुमच्या वाहनाला फास्टॅग नसेल तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC)ने हा निर्णय घेतला आहे.

आता प्रत्येक कारला, मोठ्या वाहनांना फास्टॅग लावणे बंधनकारक असणार आहे. जर तुम्ही यूपीआय, रोक रक्कम किंवा कार्डद्वारे टोल भरणार असेल तर तुम्हाला भुर्दंड द्यावा लागणार आहे. तुम्हाला डबल टोल भरावा लागणार आहे.

एमएसआरडीसीने (MSRDC) १ एप्रिलपासून हे नियम लागू केले आहे. आजपासून तुमच्या वाहनांना फास्टॅग असणे अनिवार्य आहे. याचसोबत घराबाहेर पडताना तुम्ही फास्टॅग रिचार्ज नक्की करा. ही प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. यामुळे तुम्हाला टोल भरण्यासाठी जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागणार नाही.

भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण विभागाच्या निर्देषानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे नेहमी कार घेऊन जाताना आधी फास्टॅग रिचार्ज केला की नाही हे चेक करा.

या टोलनाक्यांवर भरावा लागणार दुप्पट टोल (Toll Plaza)

जर तुम्ही कॅश, ऑनलाइन पेमेंट किंवा कार्डद्वारे पेमेंट केले तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे.

राजीव गांधी वांद्रे-वरळी सी लिंक, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, मुंबईतील एन्ट्री पॉइंटवरील ५ टोलनाके, समृद्धी महामार्गावरील २३ टोलनाके, नागपुरात ५, सोलापुरात ४, संभाजीनगरमध्ये ३ टोलनाके आहेत जिथे दुप्पट टोल आकारला जाणार आहे.

मुंबईतील दहीसर टोल नाका, मुलुंड पश्चिम टोल नाका, मुलुंड पूर्व टोल नाका, ऐरोली टोल नाका, वाशी टोल प्लाझा या टोलनाक्यावर जर फास्टॅग नसेल तर डबल टोल भरावा लागणार आहे. यामुळे तुमचा वेळ वाचणार आहे. तुम्ही ४७ सेकंदात टोल भरु शकणार आहे. यामुळे लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: MPSC च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

Maharashtra News Live Update: मुंबईत येणारच, १२ सप्टेंबरला निर्णय होणार- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

SCROLL FOR NEXT