IMD prediction of heavy rains in Maharashtra in the next 3 days Saam TV
मुंबई/पुणे

IMD Rainfall Prediction: राज्यात अवकाळी पाऊस थैमान घालणार; 'या' भागाला झोडपून काढणार, IMD अंदाज

Maharashtra Rain Alert: अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Satish Daud

Maharashtra Rain Alert

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे पुढील ४ दिवसांत देशासह राज्यातील काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होताना दिसून येत आहे. नागरिकांना कधी उन्हाच्या झळा तर कधी थंडीचा कडाका जाणवत आहेत. ४ ते ५ दिवसांपूर्वी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. मात्र, त्यानंतर ढगाळ वातावरण निवळलं होतं.

मात्र, आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचं वातावरण निर्माण होत आहे. पुढील ४ दिवसांत मुंबई, ठाणेसह पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उर्वरित ठिकाणी वातावरण कोरडं राहिल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणपूर्व बंगाल उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. कमी दाबाचा पट्टा पश्चिम-वायव्येकडे सरकले जाईल आणि गुरुवारपर्यंत बंगालच्या उपसागरावर दबाव वाढेल.

त्यामुळे भारतात १४ नोव्हेंबरपासून अवकाळी पाऊस धुमाकूळ घालू शकतो. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज आहे. याशिवाय राजधानी दिल्ली-एनसीआर परिसर आणि अंदमान आणि निकोबार बेटावर पावसाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : बडा खेला हो गया! मतदानाच्या आदल्या दिवशीच मोठा गेम; 'जन सुराज'च्या नेत्याचा उमेदवारी सोडून भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Live News Update: शरद पवारांचा मोठा निर्णय! भाजपसोबत युती नाही

Mangal Shukra Yuti 2025: 18 महिन्यांनी बनणार मंगळ-शुक्राचा संयोग; 'या' ३ राशींच्या नशीबी पैसाच पैसा

Breast Shape Change: स्तनाच्या आकारात झालेला बदल शरीराचा गंभीर इशारा असू शकतो! कॅन्सरच्या शक्यतेकडे दुर्लक्ष नको

QR Code : बनावट क्यूआर कोड कसा ओळखावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT