Lightning and dark clouds over Maharashtra; IMD warns of heavy rain and thunderstorms in Jalgaon and Thane within next three hours. saamtv
मुंबई/पुणे

Weather Update: पुढील ३ तासात महत्त्वाचे; जळगाव,मुंबईसह उपनगरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: जळगाव आणि ठाणे जिल्ह्यांसाठी आयएमडीने वादळाचा इशारा जारी केला आहे. पुढील तीन तासांत मुंबई, नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे येण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

  • पुढील ३ तासात जळगाव, ठाणे या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस

  • विजांच्या कडकडाटासह ताशी ३०ते४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता

  • मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून जोरदार पाऊस कोसळत आहे.

हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात पाण्याचे तापमान वाढले आहे. त्यामुळे राज्यात आगामी ४ दिवस विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. पुढील ३ तासात जळगाव, ठाणे या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह ताशी ३०ते४० किमी वेगाने वादळी वारे वाहणार असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे पुढील ३.४ तासांत तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पनवेलच्या बाजूने आणि बोरीवली आणि डहाणूच्या वरच्या भागात तीव्रता अधिक असू शकते. नंतर उपनगरांमध्ये पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागने वर्तवलाय. दरम्यान मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून जोरदार पाऊस कोसळत आहे.

सांताक्रुज, गोरेगाव,अंधेरी, जोगेश्वरी बोरीवली या परिसरामध्ये जोरदार पाऊस पडतोय. पावसामुळे हवेत गारवा वाढला असून सकाळपासून उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळालाय. अरबी समुद्राच्या पूर्व मध्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हा पाऊस कोसळत आहे.

मध्यरेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने

परतीच्या पावसाने रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं असून मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरूय. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला होता, त्या इशाऱ्यानुसार गेल्या चार ते पाच दिवसापासून बदलापूर अंबरनाथ तसेच ग्रामीण पट्ट्यात सतत पाऊस पडत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून ते पुढील तीन दिवस जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे.

राज्यभरातील अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावलीय. इतकेच नव्हे तर शुक्रवारी रात्री जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला आहे. आता आज पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान जिल्ह्यात पुढील तीन दिवस ढगाळ हवामान असेन.

रायगडमध्येही सलग आठवडाभरापासून परतीच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचा जोर वाढत असल्याने भात पिकं धोक्यात आले आहे.अनेक ठिकाणी भाताचे पिक शेतात साठलेल्या पाण्यात पडल्याने खराब होण्याची भिती आहे. पावसाचा जोर कमी होत नसल्याने भात कापणीच्या कामांचा खोळंबा झालाय.

नंदुरबार जिल्ह्यात येलो अलर्ट

नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार धरलाय. हवामान विभागाकडून जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केलाय. दरम्यान जिल्ह्यातील अनेक भागात कालपासून पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे चांदसैली घाटात दरड मोठ्या प्रमाणात कोसळली आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झालीय. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, जळगाव आणि धुळे या चारही जिल्ह्यात पाऊस होतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर नंदुरबार जिल्ह्याला पुन्हा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : ठाकरे गटाच्या आमदाराच्या जवळच्या सहकाऱ्याचा धिंगाणा, कारमधून फोडले २८८ फटाके

Shocking : आशियाई खेळात भारताचं नेतृत्व करणाऱ्या खेळाडूने आयुष्य संपवलं, क्रीडा विश्वात खळबळ

भारताविरोधात चीन्यांची नवा डाव? पेंगाँग जवळ चीनचा हवाई तळ?

Shocking : कॉलेजला जाताना अडवलं; भररस्त्यात तरुणीवर तरुणाकडून अॅसिड हल्ला, राजधानीत खळबळ

Vitamins: जास्त व्हिटॅमिन्सही बरं नव्हं! अति सेवनाने आरोग्यावर होतो दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT