Chandrakant Patil Latest News: भाजप नेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी काल औरंगाबादेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ' कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनी भीक मागून शाळा सुरु केल्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं होतं. त्यानंतर आज, शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. या घटनेनं राज्यात खळबळ माजली असून भाजप नेते संतप्त झाले आहे.
या हल्ल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्यावर झालेला हल्ला हा भ्याड स्वरूपाचा आहे. हिंमत असेल तर हल्लेखोरांनी समोरासमोर येऊन माझ्यावर हल्ला करावा आम्ही तयार आहोत असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. (Chandrakant Patil's first reaction after the Ink Throw)
शाही हल्ल्यानंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत म्हणाले की, मी दोन-तिनदा स्पष्टीकरण देऊनही माझ्यावर शाई फेकून हल्ला करण्यात आला. हे अतिशय निंदनीय आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले. आम्ही कायदा व सुव्यवस्था हाती घेणार नाही. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं तर आम्ही रस्त्यावर उतरुन या हल्ल्याचा निषेध करू असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले. (Latest Marathi News)
तसेच शिवसेना उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी समोर येऊन या हल्ल्यासंदर्भात आपलं मत व्यक्त करावं असं आव्हान देखील चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. (Ink was thrown on Chandrakant Patil In Pune)
दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीच्या घटनेनंतर भाजप नेते अतिशय आक्रमक झाले आहे. अशा भ्याड हल्ला करणाऱ्यांना घरात घुसून मारू असा संतप्त इशारा भाजप आमदार राम कदम यांनी दिला आहे. (Tajya Batmya)
घटनेनंतर शाईफेक करणाऱ्याला चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी उपस्थित झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीच्या घटनेनंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.