सत्ता दिल्यास कल्याण-डोंबिवलीकरांना दिल्लीप्रमाणे सुविधा देऊ - आम आदमी पक्ष प्रदीप भगणे
मुंबई/पुणे

सत्ता दिल्यास कल्याण-डोंबिवलीकरांना दिल्लीप्रमाणे सुविधा देऊ - आम आदमी पक्ष

कल्याणात झालेल्या पदाधिकारी-कार्यकर्ते मेळाव्याप्रसंगी बोलताना आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी हे आश्वासन दिले आहे.

प्रदीप भणगे

कल्याण : आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मतदारांनी आम्हाला सत्ता दिल्यास दिल्लीप्रमाणे नागरी सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आम आदमी अर्थातच आपने कल्याण मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन  दिले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणात झालेल्या पदाधिकारी-कार्यकर्ते मेळाव्याप्रसंगी बोलताना आपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी हे आश्वासन दिले आहे. (If power is given, we will give facilities to Kalyan-Dombivalikars like Delhi - Aam Aadmi Party)

हे देखील पहा -

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने लोककल्याणकारी व्यवस्था कशी असावी याचा धडा सर्वच राजकीय पक्षांपुढे मांडला आहे. दिल्ली सरकारने राबविलेल्या असंख्य लोकहिताच्या योजना आज जनतेच्या कौतुकाच्या व प्रशंसेस पात्र ठरल्या आहेत. दिल्लीतील सरकारी शाळांची तुलना खासगी शाळांसोबत केली जात आहे. त्याचबरोबर घरपोच दाखले - प्रमाणपत्रे, २०० युनिट मोफत वीज, मोफत पाणी अशा सुविधांची गेल्या १० वर्षांपासून अंमलबजावणी केली जात असल्याचेही राचुरे यांनी सांगितले. आजपर्यंत देशात कुणीही अशा कोणत्याही योजना राबविण्याची कल्पकता आणि धाडस दाखवले नसून लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवल्यास कल्याण-डोंबिवलीतही दिल्ली मॉडेल राबवण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला. इथल्या जनतेने आतापर्यंत भाजप, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी अशा सर्वच प्रमुख प्रस्थापित पक्षांच्या कारभाराचा अनुभव घेतला असून एकाही पक्षाने 'आप'प्रमाणे स्वच्छ कारभार केलेला नसल्याचे यावेळी प्रदेश निरिक्षक विजय कुंभार यांनी सांगितले.

कल्याण-डोंबिवलीकरांना 'आप' या सुविधा देणार -

मोफत पाणी , महिला - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास, खड्डेमुक्त आणि सुरक्षित दर्जेदार रस्ते, महापालिकेतील टक्केवारीने बरबटलेली भ्रष्टाचारी साखळी मोडीत काढणार, फेरीवाल्यांना दोन वर्षांत फेरीवाला धोरणानुसार टप्प्याटप्प्याने जागा निर्धारित करून देणार,  महापालिकेची परिवहन सेवा तोट्यातून फायद्यात चालवून प्रवाशांना वेळापत्रकानुसार बससेवा पुरविणार अशी आश्वासनं आपने दिली आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून जल्लोष

Raksha Bandhan 2025: शास्त्रानुसार राखी कोणत्या हाताला बांधावी?

HBD Kiara Advani : सुंदर दिसण्यासाठी कियारा अडवाणी लावते 'हा' फेसपॅक, फक्त ५ रूपयांत घरीच होतो तयार

Bank Loan Recovery : 'आधी पैसे दे, नंतर बायकोला घेऊन जा', कर्जाचे पैसे न दिल्याने बँकेने महिलेला नेलं उचलून

Murud-Janjira To Vasai Fort: मुरुड जंजिरा किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत जायचंय? वाचा सर्वोत्तम वाहतुकीचे पर्याय

SCROLL FOR NEXT