IAS tukaram mundhe FDA Issues New Rules Mahaprasad Saam TV
मुंबई/पुणे

मोठी बातमी: सणासुदीत महाप्रसाद, भंडाऱ्याचे आयोजन करताय? परवानगी कशी घ्याल? जाणून घ्या सोपी प्रक्रिया

Mahaprasad Permission Maharashtra : सणासुदीत महाप्रसाद, भंडारा, अन्नछत्र किंवा लंगर आयोजित करताय? महाराष्ट्र FDA ने सामूहिक अन्नवाटपासाठी नवीन नियम जाहीर केले आहेत.

Namdeo Kumbhar

how to get permission for mahaprasad in Maharashtra : सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम, यात्रा, उरूस किंवा सार्वजनिक सोहळ्यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या महाप्रसाद, अन्नछत्र, लंगर आणि भंडारा यांसारख्या सामूहिक अन्नवाटप कार्यक्रमांबाबत FDA महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अशा कार्यक्रमांमध्ये अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने नियमावली जाहीर केली. आता आयोजकांना कार्यक्रमाच्या किमान ७ दिवस अगोदर प्रशासनाला पूर्वसूचना देऊन परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

परवानगी (पूर्वसूचना) कशी आणि कुठे मिळवाल?

अन्न व औषध प्रशासनाच्या https://complaints.mahafda.in किवा https://complaints.mahafda.in या अधिकृत पोर्टलवर जावे.

या पोर्टलवर "सामूहिक अन्नवाटप पूर्वसूचना नमुना" (Mass Food Distribution Notification Form) उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या किमान ७ दिवस अगोदर हा अर्ज ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि नागरिकांच्या आरोग्याबाबत शासन अत्यंत कठोर आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळे सर्व आयोजक, संस्था आणि केटरर्सनी अन्नसुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य
Maharashtra FDA rules

कोणासाठी बंधनकारक?:

परवानाधारक किंवा नोंदणीकृत केटरर, स्वयंपाकघर किंवा संस्थांमार्फत जिथे जिथे सामूहिक अन्न तयार करून वितरित केले जाते, त्या सर्वांना ही माहिती देणे अनिवार्य राहील.

'या' नियमांचे पालन करणे गरजेचे:

अन्न शिजवताना आणि वाटताना पूर्ण स्वच्छता व केवळ पिण्यायोग्य सुरक्षित पाण्याचा वापर करावा.

शिजवलेले अन्न योग्य तापमानावर साठवावे.

कच्चे अन्नपदार्थ आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवू नये (Cross-contamination रोखण्यासाठी).

अन्न हाताळणाऱ्या आचारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता बाळगणे अनिवार्य आहे.

प्रशासनाकडून अचानक तपासणी होणार

आयोजकांनी पोर्टलवर दिलेली पूर्वसूचना प्राप्त झाल्यानंतर, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी संबंधित ठिकाणी जाऊन अचानक तपासणी करू शकतात. गरजेनुसार अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेतले जातील आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाईल.

तक्रारीसाठी संपर्क कसा साधाल?

अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत काही तक्रार किंवा गैरप्रकार आढळल्यास नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक 1800 222 365 वर संपर्क साधावा. अथवा https://complaints.mahafda.in किंवा https://complaints.mahafda.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : भीषण अग्नितांडव! दोन शाळा जळून खाक, २९ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

Bank Closed : आजपासून पुढील ४ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या काय आहे कारण

साताऱ्यात खळबळजनक प्रकार! भाजपच्या नेत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, धक्कादायक कारण समोर

Cancer warning signs: शरीरातील छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात; कॅन्सरचे संकेत ओळखण्यासाठी करा या ५ तपासण्या

SCROLL FOR NEXT