IAS Transfer update :  Saam tv
मुंबई/पुणे

IAS Transfer : मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच बदल्यांचे आदेश; राज्यातील २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS Transfer update : मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. आज मंगळवारी राज्यातील २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

Vishal Gangurde

दोन वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

सिद्धराम सालीमठ यांची नियुक्ती कोकण विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी

विकास पानसरे यांची नियुक्ती मुंबईतील MSSIDC चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आरक्षणाची सोडतही जाहीर झाली आहे. दुसरीकडे शासनाकडून IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी आज दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बैठकीनंतर आज सायंकाळी बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यमंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. मुख्यमंत्र्यांनी राज्याची सूत्रे हातात घेतल्यापासून राज्यात प्रशासकीय वर्तुळात खांदेपालट पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेली अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा सुरुच असल्याचं दिसत आहे.

कुणाची कुठे बदली?

1) पुण्याचे साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांची मुंबईत कोकण विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिद्धराम सालीमठ हे २०११ सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

2) कोकण विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त विकास मारुती पानसरे यांची बदली करून त्यांची नियुक्ती मुंबईत महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. विकास पानसरे हे २०१४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

कोण आहेत सिद्धराम सालीमठ?

सिद्धराम सालीमठ हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. सालीमठ यांनी राहुलीच्या कृषी विद्यापीठातून एमएससी पदवी प्राप्त केली.

कोण आहेत विकास पानसरे?

विकास पानसरे हे २०१४ सालच्या बॅचचे अधिकारी आहेत. ते मूळचे संगमनेर येथील आहेत. त्यांनी अहमदनगर जिल्हा जात पडताळणी समितीचं प्रमुख म्हणूनही काम पाहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today : सोनं झालं स्वस्त! प्रति तोळा तब्बल 'इतक्या' रुपयांनी घटले भाव; पाहा आजचे लेटेस्ट रेट्स

Maharashtra News Live Update: चांदोली धरण परिसरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस

Mumbai : मुंबईतील धक्कादायक प्रकार, बोगस पदवीने मिळवली सरकारी नोकरी, असं उघड पडलं पितळ

Viral News : अजब लग्नाची गजब गोष्ट! एकत्र राहण्यासाठी ३ सख्ख्या बहिणींनी एकाच नवरदेवाशी केला विवाह

IND vs ZIM: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा 7 विकेट्सने केला पराभव

SCROLL FOR NEXT