IAS Pooja Khedkar And Manorama Khedkar  Saamtv
मुंबई/पुणे

IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरांच्या अडचणी आणखी वाढणार, आईच्या नावावर असलेली कंपनी जप्त होणार; नेमकं कारण काय?

IAS Pooja Khedkar Mother Manorama Khedkar: मनोरमा खेडकर यांच्या नावावर पिंपरी चिंचवडमध्ये थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीवर महापालिकेकडून जप्तीची कारवाई होणार आहे.

Priya More

गोपाल मोटघरे, पिंपरी-चिंचवड

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पूजा खेडकरांची आई मनोरमा खेडकर यांच्या नावावर असलेली कंपनी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेकडून जप्त होण्याची शक्यता आहे. मनोरमा खेडकर यांच्या नावावर पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीवर पालिकेकडून जप्तीची कारवाई होणार आहे. या कंपनीने पालिकेचा कर बुडवला आहे. त्याप्रकरणी ही कारवाई होण्याची शक्यता आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील ज्योतिबानगर तळवडे येथे मनोरमा खेडकर यांची थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीने पिंपरी चिंचवड महापालिकेचे २ लाख ७७ हजार इतकं कर मागील दोन वर्षापासून बुडविले आहे. तसेच थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी खेडकर कुटुंबीयांनी रेड झोनमध्ये उभारली आहे. त्यामुळे खेडकर कुटुंबीयांची ही कंपनी देखील अनधिकृत असल्याचे शिक्कामोर्तब पिंपरी चिंचवड महापालिकेने केला आहे.

पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी याच कंपनीचा पत्ता आपले निवासस्थान म्हणून दाखवला होता. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका खेडकर कुटुंबीयांच्या कर थकविणाऱ्या कंपनीवर जप्तीची कारवाई करण्याची शक्यता आहे. तसेच ही कंपनी रेड झोन मध्ये उभारली असल्याने या कंपनीवर पिंपरी चिंचवड महापालिका हातोड देखील चालू शकते, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकरी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या आई मनोरमा खेडकर यांना गुरूवारी पोलिसांनी अटक केली. पुणे पोलिसांनी महाड येथील हॉटेलमधून त्यांना अटक केली. मनोरमा खेडकर यांच्यावर शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी १२ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या फरार होत्या. ६ दिवशी त्यांना अटक करण्यात आली. मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर हे खोट्या नावाचा वापर करून महाड येथील हॉटेलमध्ये राहिले. अटकेनंतर मनोरमा खेडकर यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांना २ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: बापरे... भल्यामोठ्या टॉवरवर कामगारांचा रिल्स; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Aadhaar Card: मृत्यूनंतर Aadhaar Card, पॅन कार्डचे काय होणार? नियम वाचा

Maharashtra CM : शिंदेंसेनेचा विरोध, तरीही भाजप देवेंद्र फडणवीसांच्या फेवरमधये, लवकरच घोषणा होणार?

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेच्या नावाची पाटी पुन्हा लागली | VIDEO

Winter Health Care Tips: हिवाळ्यात हे सुपरफूड्स खा; सर्दी- खोकल्यापासून मिळेल आराम

SCROLL FOR NEXT