Jitendra Awhad Saam Tv
मुंबई/पुणे

Thane News: 'माझा राम मला जनसेवेत आणि कामात दिसतो', जितेंद्र आव्हाड यांनी केली तुळजाभवानी मंदिरात महाआरती

Jitendra Awhad: शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत आज पांचपाखाडी येथील तुळजाभवानी मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.

साम टिव्ही ब्युरो

>> हिरा ढाकणे

Jitendra Awhad On Ram Mandir Inauguration:

शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत आज पांचपाखाडी येथील तुळजाभवानी मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी मला माझा राम चराचरात, जनसेवेत आणि माझ्या कामात दिसतो, असे ते म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादीने आज शहरातील विविध मंदिरांमध्ये सुमारे दीड ते दोन लाख लाडूंचे वाटप केले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अयोध्येत श्री रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात असल्याने ठाण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अनेक मंदिरात लाडू वाटप करण्यात आले. तसेच मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला कळवा पूर्वेत भागात रामलल्लाची मिरवणूकही काढण्यात आली होती. (Latest Marathi News)

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आज प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे, याबद्दल तमाम भारतीयांच्या मनात आनंद दाटून आला आहे. हा राम कुण्या एकाचा नाही तर हा राम भारत भूमीवर जन्माला आलेल्या प्रत्येकाचा आहे. त्यामुळेच आमच्या रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्यानेच आज आम्ही महाआरतीचे आयोजन केले होते. तसेच कळव्यात सुमारे 50 हजार झेंडे आणि एक लाख लाडूंचेही वाटप विविध मंदिरांमध्ये केले.

निमंत्रणाबाबत विचारले असता, निमंत्रण देणे हा कुणाचाच अधिकार नाही. तुळजाभवानी मंदिरात आयोजित महाआरतीचे निमंत्रण दिलेय का? देव हा सगळ्यांचाच आहे. त्यामुळे देवाच्या चरणी लीन होण्यासाठी निमंत्रण कशाला? देवाची मालकी सांगण्याचा जो प्रकार सुरू झालाय तो मनाला खटकण्यासारखा आहे. तरीही आपण या ठिकाणी सांगतो की आपणाला आपला राम कामात दिसतो. मला तो तुळजाभवानी मंदिरात दिसतो, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT