Laxman Hake Viral Video Saam TV
मुंबई/पुणे

Laxman Hake Explanation: '⁠मी मद्यप्राशन केलेलं नाही, कोणतीही टेस्ट करायला तयार', मराठा आंदोलकांच्या आरोपांवर लक्ष्मण हाके यांचं स्पष्टीकरण

Laxman Hake Viral Video : लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन शिवीगाळ आणि जीवेमारण्याची धमकी दिल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे. यावर आता लक्ष्मण हाके यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Satish Kengar

नितीन पाटणकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

मराठा आंदोलन आणि ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके यांच्यामध्ये पुण्यात संघर्ष पाहायला मिळतोय. हाके यांनी मद्यप्राशन करून मराठा आंदोलन यांना शिवीगाळ आणि जीवेमारण्याची धमकी दिल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे. या घटनेनंतर मराठा आंदोलकांनी हाके यांना कोढंवा पोलीस स्टेशन या ठिकाणी आणले आहेत. मराठा आंदोलकांच्या आरोपांवर लक्ष्मण हाके यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे.

स्पष्टीकरण देताना काय म्हणाले लक्ष्मण हाके?

स्पष्टीकरण देताना लक्ष्मण हाके म्हणाले आहेत की, '' मी कोणतीही टेस्ट करायला तयार आहे. ⁠मी मद्यप्राशन केलेलं नाही. ⁠मी दारू पिलोय, असा आरोप करून कोणी ओबीसीचा आवाज दडपू शकत नाही. ⁠मी माझी चळवळ माझं काम सुरूच ठेवणार आहे.''

ते म्हणाले की,⁠ ''मी पोलिसांच्या समोर उपस्थित आहे. पोलीस म्हणतील त्याप्रमाणे प्रत्येक टेस्ट करायला मी तयार आहे. ⁠मला जीवेमारण्याचा प्रयत्न झाला आहे. ⁠या विरोधात मी माझी तक्रार पोलिसांकडे देणार आहे.''

लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की, '⁠पाच वाजल्यापासून दोन लोक माझ्या मागावर होते. ⁠या दोन लोकांनी पाच वाजता माझ्याशी चर्चा केली. ⁠त्यानंतर याच दोन लोकांनी सात वाजल्यानंतर माझी कॉलर पकडून माझ्याकडून दारू पिलो असल्याचे ओतून घेण्याचा प्रयत्न केला.''

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. पोलीस स्टेशनच्या आवारात मराठा आंदोलक घुसले आहेत. त्यांनी हाके यांची मेडिकल टेस्ट करण्याची मागणी केली. यानंतर आता लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी मेडिकल टेस्टसाठी नेल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT