Vaishnavi Hagawane Case  Saam Tv
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane: ...कदाचित आज वैष्णवीच्या जागी मी असते, हगवणेंच्या मोठ्या सूनेने कुटुंबाच्या काळ्या कारनाम्याचा पडदा फाडला

Mayuri Hagawane Statement: वैष्णवी हगवणे प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी वैष्णवीची मोठी जावबाई मयुरी हगवणेने पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी तिने हगवणे कुटुंबीयांच्या काळ्या कारनाम्यांचा पडदा फाडला.

Priya More

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून वारंवार होणारा मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून वैष्णवीने १६ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वैष्णवीच्या आई-वडिलांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणदेला अटक केली आहे. तर तिचे सासरे आणि दीर फरार आहेत. या दोघांचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. वैष्णवीची जावबाई मयुरी जगतापने या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया देली. हगवणेंच्या मोठ्या सूनेने कुटुंबाच्या काळ्या कारनाम्याचा पडदा फाडला आहे.

मयुरी जगताप ही राजेंद्र हगवणे यांची मोठी सून आहे. राजेंद्र हगवणेच्या कुटुंबाने मयुरीला देखील वैष्णवीप्रमाणेच त्रास दिला. तिचा देखील वारंवार छळ आणि मारहाण ते करत होते. या छळाला कंटाळून मयुरीने घर सोडले आणि ती आता माहेरी राहते. मयुरीला तिची सासू, नणंद आणि दीर म्हणजेच वैष्णवीचा नवरा देखील मारहाण करत होता. तिला तिच्या नवऱ्याने साथ दिली. माझ्या नवऱ्याने मला साथ दिली नाही तर आज वैष्णवीच्या जागी मी असते असे वक्तव्य मयुरीने केले आहे.

मयुरी जगतापने आपल्या सासरच्या लोकांवर अनेक गंभीर आरोप केले आहे. तिने सांगितले की, '२०२२ मध्ये माझं सुशीलसोबत लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर सुरूवातीला माझ्या सासरची लोकं माझ्याशी चांगले वागले पण नंतर त्यांनी मला त्रास द्यायाल सुरूवात केली. माझा दीर, नणंद, सासू सतत माझा छळ करत होते आणि मारहाण करत होते. माझी नणंद करिश्मा माझ्याशी सतत भांडायची. मला वैष्णवीसोबत कधीच बोलून दिलं नाही. वैष्णवीचा नवरा देखील मला मारायचा. माझा नवरा बाहेर गेल्यावर मला ते मारहाण करायचे.

मी प्रत्युत्तर देणं हे त्यांच्यानुसार चुकीचे होते. त्यामुळे ते मलाही मारहाण करायचे. चुकीच्या गोष्टाला मी विरोध करते म्हणून ते मारहाण करत होते. मुलीचं ऐकून सासू मला त्रास देत होती. माझ्या नवऱ्याला मी सांगायचे तेव्हा आम्ही वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. वेगळं राहत होते तरी देखील ते त्रास देत होते. माझ्या नवऱ्याने मला साथ दिली. त्याने नेहमी मला पाठिंबा दिला. हे पाहून माझे सासरचे त्याला देखील त्रास देत होते. त्यांच्या मुलालाही त्यांनी सोडलं नाही. ते माझी बाजू घ्यायचे म्हणून त्यांनाही ते मारहाण करायचे. तो ढसाढसा रडायचा. माझा नवरा खूप चांगला होता. ही लोकं सुधारणार नाहीत त्यामुळे त्याने मला तू तुझ्या घरी जा असे सांगितले. नाहीतर आज वैष्णवीच्या जागी मी स्वत: असते.

'वैष्णवीला तिच्या नवऱ्याची कधी साथ मिळाली नाही. वैष्णवीचा नवरा शशांक मला देखील मारायचा. घरातच एका वेगळ्या खोलीत मी माझा संसार थाटला होता. आम्ही वेगळे राहायचो तर सासरची लोकांनी लाईट कापाली, पाणी बंद केलं, लादी पुसायला बाई येऊन देत नव्हते. गावात कुणालाही माझ्याशी बोलून द्यायचे नाहीत. माझी नणंद मला जेवण देत नव्हती. जेवणासाठी खूप हालहाल केले आणि शारीरिक त्रास दिला. त्यानंतर आम्ही घर सोडून दुसरीकडे भाड्याने राहायला जाण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला कुठे रूम देखील मिळवून देत नव्हते.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games 2026: पावसाने दोन्ही सामन्यांचा निकाल बदलला; भारत आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये, फायनलचा महामुकाबला होणार का?

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

SCROLL FOR NEXT