धक्कादायक! चाकूने वार करत पतीने केली पत्नीची निर्घुण हत्या सुरज सावंत
मुंबई/पुणे

धक्कादायक! चाकूने वार करत पतीने केली पत्नीची निर्घुण हत्या

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी हसनला अटक केली आहे.

सुरज सावंत

मुंबई - अंधेरी भागातील डी.एन.नगर परिसरात एक धक्कदायक घटना घडली आहे. पतीने पत्नीची निर्घुण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नेहा गंगासागर गुप्ता(२०) असे या मृत महिलेचे नाव असून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

हे देखील पहा -

या प्रकरणी डि.एन.नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी पती हसन अब्दुल पठान याला अटक केली आहे. नेहा आणि आरोपी हसन यांची ओळख २०१४ मध्ये झाली होती. २०१९ मध्ये आरोपी हसनने नेहाला पळवून नेले होते. या प्रकरणी नेहाच्या आईने हसन विरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. मात्र कालांतराने दोघांमध्ये होणाऱ्या वादाला कंटाळून नेहा पून्हा आईच्या घरी परतली.

५ मे २०२१ रोजी नेहा कामावरून तिच्या घरी न जाता हसनच्या घरी गेली होती. तेथे दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून हसनने नेहावर चाकूने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात नेहा पडल्यानंतर आरोपी हसनने घराला टाळा मारून पळ काढला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी हसनला अटक केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death : काम करण्याची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती; अजित पवारांच्या निधनानंतर प्रकाश आंबेडकरांची भावुक पोस्ट

अजितदादांच्या विमानाचं टेकऑफ ते अपघात...नेमकं काय घडलं ?

Ajit Pawar Death: अजित पवारांचे 'ते' ५ मोठे निर्णय; धडाडी निर्णयांनी बदलली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

नजर जाईल तिथपर्यंत कार्यकर्त्यांची अलोट गर्दी, अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी जमला जनसमुदाय|VIDEO

Thursday Horoscope : जुन्या चुकांमधून धडा घ्यावा लागेल; ५ राशींच्या लोकांना जपून निर्णय घ्यावे लागेल

SCROLL FOR NEXT