सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी
मुंबई : मुंबईच्या गिरगावमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत नवऱ्याने बायकोवर प्राणघातक हल्ला केला आहे. नवऱ्याने भर रस्त्यात धारधार शस्त्राने महिलेचा गळा कापण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईच्या गिरगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. गिरगावमधील या घटनेने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या गिरगावात नवऱ्याने बायकोवर जीवघेणा हल्ला केला आहे. बायको ऑफिसला जाताना नवऱ्याने धारधार शस्त्राने गळा कापण्याचा प्रयत्न केला आहे. बायकोवरील हल्ल्यानंतर नवऱ्याने स्वत:चाही हात कापून घेतला आहे.
बायको विभक्त राहत असल्याचा रागातून नवऱ्याने हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी हल्लेखोराविरोधात व्हीपी रोड पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर महिला आणि पुरुष दोघे रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.
या व्यक्तीची पत्नी गेल्या काही दिवसांपासून नवऱ्यापासून विभक्त राहत होती. विभक्त राहत असल्याच्या रागातून पतीने तिला ऑफिसला जाताना गाठलं. त्यानंतर नवऱ्याने बायकोच्या गळ्यावर धारदार ब्लेडने वार करून जखमी केले.
बायकोवर हल्ला केल्यानंतर नवऱ्याने स्वत:च्या डाव्या हाताची नस कापून स्वत:ला जखमी केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला गिरगावमधील एचएन रिलायन्स हॉस्पिटल दाखल केले. तर जखमी नवऱ्याला उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल केले. या घटनेप्रकरणी जखमी महिलेचा जबाब नोंदवून आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गोरेगावच्या जवार नगरमध्ये पेडणेकर दाम्पत्याचे मृतदेह सापडले होते. या भागातील इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये महिलेचा आढळून आला आहे. ५६ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह रक्ताचा थारोळ्यात आढळला होता. या प्रकरणात ५६ वर्षीय किशोर पेडणेकरने त्याची पत्नी डॉ. राजश्री पेडणेकर यांची गळा आवळून हत्या केल्याचे उघड झाले आहे. या आत्महत्या-हत्या प्रकरणाचा कसून तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.