Vasai Accident Saam tv
मुंबई/पुणे

Vasai Road Accident : दुर्दैवी! रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशीच काळाची झडप; राखी बांधायला जाताना वाटेत बहिणीसह तिच्या पतीचाही मृत्यू

husband and wife Accident : रक्षाबंधनाच्या आदल्या रात्रीच काळाने बहीण-भावाला दूर केलं आहे. भावाला राखी बांधायला जाताना पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने रक्षाबंधनाच्या दिवशी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Vishal Gangurde

महेंद्र वानखेडे, साम टीव्ही प्रतिनिधी

वसई : रक्षाबंधनाच्या दिवशी वसईतून दु:खद बातमी समोर आली आहे. वसईतून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या महामार्गावर रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी पती-पत्नीचा अपघात झाला. रविवारी सायंकाळी ५ वाजता घडलेल्या भीषण अपघाताच्या घटनेने बहीण-भाऊ दूर झाले आहेत.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रविवारी पती-पत्नीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भावाला राखी बांधायला निघालेल्या महिलेचा भीषण अपघाताचा मृत्यू झाला आहे. महामार्गावरील अपघातात ट्रक-चालकच्या धडकेत दुचाकीवर असलेल्या पती,पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मिरारोडवरून विरारला भावाला राखी बांधण्यासाठी बहीण जात होती. ६२ वर्षीय प्रेमा रूपचंद उपाध्याय तर ६७ वर्षीय रूपचंद राममुरत उपाध्याय असे मृत व्यक्तीचे नाव आहेत. ट्रक चालक प्रकाश रावत याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाच्या विरोधात पेल्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रक्षाबंधनापूर्वी बहिणभावाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

रक्षाबंधनासाठी आलेल्या बहिणीला कारमधून गावाकडे घेऊन जाताना भीषण अपघात झालाय. यामध्ये मंगळवेढा येथील बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. हा अपघात रविवारी सायंकाळी पंढरपूर जवळच्या गोपाळपूर येथे झाला. या अपघातात तात्या जाधव आणि ऋतुजा जाधव या दोघांचा मृत्यू झाला आहे.

पंढरपूरहून मंगळवेढाकडे निघालेल्या स्विफ्ट कारला समोरून येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली. यामध्ये कारचा चक्काचूर झाला. यामध्ये बहीण-भाऊ जागीच ठार झाले आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

SCROLL FOR NEXT