HSRP Number Plates  Saam Tv
मुंबई/पुणे

HSRP Number Plate: HSRP नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख काय? या तारखेपूर्वी करा काम अन्यथा बसणार दंड

HSRP Number Plate Deadline and Fine: एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठीची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. जर तुम्ही त्याआधी नंबरप्लेट बसवली नाही तर दंड भरावा लागेल.

Siddhi Hande

HSRP नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख

एचएसआरपी नंबरप्लेट न बसवल्यास भरावा लागणार दंड

सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य

सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे. जर एचएसआरपी नंबप्लेट बसवली नाही तर तुम्हाला दंड बसू शकतो. २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. त्यानंतरच्या वाहनांना आधीच हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसवली आहे. दरम्यान, राज्यातील अनेक वाहनधारकांनी अजूनही नंबर प्लेट बसवलेली नाहीये. त्यामुळे नंबरप्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

HSRP नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख (HSRP Number Plate Deadline)

आता एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ असणार आहे.त्याआधी सर्व वाहनधारकांनी ही नंबरप्लेट बसवायची आहे.

आतापर्यंत राज्यात फक्त ७३ लाख वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवली आहे.२०१९ पूर्वीच्या एकूण २.१० कोटी वाहनांवर ही नंबरप्लेट लावणे आवश्यक आहे. दरम्यान, आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, अजूनही ६५ टक्के वाहनांवर एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे बाकी आहे. त्यामुळे ही आकडेवारी खूप मोठी आहे. यामुळेच ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

हाय सिक्युरिटी नंबरप्लेटमध्ये काय आहे खास? (HSRP Number Plate Features)

हाय सिक्युरिटी नंबर प्लेटमध्ये सिक्युरिटी फीचर्स आणि होलोग्राम असतो. यामुळे या नंबरप्लेटची नक्कल करणे शक्य नाही. अपघात किंवा गुन्हा झाल्यावर तो ओळखण्यासाठी वाहनाची नंबरप्लेट लागते. यामुळे ही नंबरप्लेट गरजेची आहे. यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात येईल.

एचएसआरपी नंबरप्लेट न बसवल्यास दंड

एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी ३१ डिसेंबर २०२ ही शेवटची तारीख आहे. दरम्यान, जर ही नंबरप्लेट लावली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. १०,००० रुपयांचा दंड भरावा लागेल. जर तुम्ही ही नंबरप्लेट बसवली नाही तर तुमची आरटीओमधील कोणतीही कामे होणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दुष्काळी बीड जिल्ह्यात यंदा भूजल पातळी 1.75 मीटरने वाढली

रूळावर महिलेचा मृतदेह; संतप्त जमावाचा २ पोलिसांवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये नेमकं घडलं काय?

Protein shake cancer risk: वर्कआउटसाठी घेत असलेला प्रोटीन शेक ठरतोय जीवघेणा? कॅन्सरचा धोका असल्याचा तज्ज्ञांकडून खुलासा

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

Cheapest Gold: जगामध्ये सर्वात स्वस्त सोनं कोणत्या देशात मिळते?

SCROLL FOR NEXT