Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Hall Ticket
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Hall Ticket saam tv
मुंबई/पुणे

HSC Exam Hall Ticket : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सोमवारपासून मिळणार हॉल तिकीट; जाणून घ्या सूचना

Siddharth Latkar

- सचिन जाधव

Pune News :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary) फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी (HSC Exam 2024) विद्यार्थ्यांची ऑनलाइन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) सोमवारपासून (ता. 22) उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती मंडळाने कळविली आहे. विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत ही प्रवेशपत्र मिळणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले. (Maharashtra News)

फेब्रुवारी-मार्च २०२४ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी बारावीच्या परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावेत, अशी सूचना राज्य मंडळाने केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांनी, प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

प्रवेशपत्र गहाळ झाल्यास पुन्हा द्यावे

प्रवेशपत्रात विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात. विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र गहाळ झाल्यास संबंधित महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यावे, अशा सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केल्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss OTT 3 : "अरमान मलिकची बिग बॉसमधून हकालपट्टी करा", विशाल पांडेचे आई-वडील संतापले; नेमकं काय घडलं?

Mumbai VIDEO: मुंबईतील विमानसेवा पुर्वपदावर, इतर ठिकांनी वळवलेली विमानसेवा पुन्हा मुंबईत

Oil Free Recipes : सकाळी तेलकट नाश्ता नको; मग ही ऑईल फ्री रेसिपी नक्की ट्राय करा

Palghar Accident: रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी धाडकन आदळली; दीड वर्षाचा चिमुकला आईच्या हातातून निसटला, जागेवर झाला मृत्यू

Government Job: दहावी पास उमेदवारांना नगरपरिषदेत नोकरीची उत्तम संधी; अर्ज कुठे अन् कसा कराल? जाणून घ्या सविस्तर...

SCROLL FOR NEXT