Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Assembly Election : ठाकरे गटाचं विधानसभेचं जागावाटप ठरलं? शिवसेनेच्या बैठकीत आकडा झाला निश्चित; वाचा

Thackeray Group News : आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट किती जागा लढणार याची माहिती समोर आली आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मागील दहा दिवसांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर नेत्यांच्या बैठका पार पडल्या.

या बैठकांमध्ये राज्यातील २८८ मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाच्या मॅरेथॉन बैठकीत १००-१०५ जागांबाबत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यातच महाविकास आघाडीतमध्ये उद्धव ठाकरे गट १०० ते १०५ जागा लढवणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणूक आणि अलीकडेच पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर मविआत ठाकरे गटाचं वर्चस्व वाढवलं असल्याचं चित्र आहे.

यातच आगामी विधानसभा निवडणुकीत मविआत ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यात आहे. यातच अनेक अशा जागा आहेत, ज्याठिकाणी ठाकरे गटाचे वर्चस्व आहे. यातच मुंबई विधानसभा मतदारसंघाची बैठक लवकरच मातोश्रीवर पार पडणार आहे.

स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत उद्धव ठाकरे यांची ही बैठक पार पडली आहे. या बैठकीत ज्या पक्षाला, ज्या मतदारसंघात अनुकूल वातावरण असेल, तो मतदारसंघ त्या पक्षाला सोडण्याचे नेत्यांमध्ये एकमत झाल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.

तसेच ज्या मतदारसंघात एकापेक्षा अधिक पक्ष इच्छुक असतील त्यावर वरिष्ठ नेते येत्या दोन दिवसात तोडगा काढणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. तसेच महाविकास आघाडीमध्ये विद्यमान आमदार असलेले मतदारसंघ त्याच पक्षाला मिळणार असल्याची सूत्रांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढला! मुंबईसह ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

Maharashtra News Live Update : डॉ. अमोल कोल्हे यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आग्रही मागणी

भाच्याचा संसार मोडल्याचा प्रचंड राग! जंगलात नेऊन सासऱ्याच्या डोक्यात घातला दगड; पुण्यात हत्येने खळबळ

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव! हायप्रोफाईल सोसायटीचा ११ वा मजला जळून खाक, २ जणांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई हादरली! मध्यरात्री ३ ते ४ घरांवर दरड कोसळली; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ८जण ढिगाऱ्याखाली

SCROLL FOR NEXT