Navi Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

गृहनिर्माण सोसायटीने 3 महिन्यात पाण्याच्या टँकरवर खर्च केले 32 लाख; खारघर मधील पाणी प्रश्न जटिल

पनवेल महानगरपालिकेत येणाऱ्या खारघर नोड मध्ये पाण्याची समस्या जटिल होत चालला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई - खारघर मध्ये पाण्याची समस्या इतकी बिकट होत चालली आहे की एक गृहनिर्माण सोसायटीला मागील 3 महिन्यात तब्बल 32 लाख रुपये पाण्याच्या टँकरवर खर्च करावे लागले आहे. त्यामुळे पाण्यासाठी इतका पैसा खर्च करावा लागत असेल तर नागरिकांनी उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न उपस्थित होत आहे.

पनवेल (Panvel) महानगरपालिकेत येणाऱ्या खारघर नोड मध्ये पाण्याची समस्या जटिल होत चालला आहे. पनवेल महानगरपालिका असली तरी पाण्याचे नियोजन सिडको करत आहे. मात्र 50 टक्के देखील पाणी सिडको (Cidco) पुरवठा करीत नाही. परिणामी गृहनिर्माण सोसायट्यांना खाजगी टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे.

हे देखील पाहा -

खारघर मधील महावीर हेरिटेज या गृहनिर्माण सोसायटीला मागील 3 महिन्यात तब्बल 1200 पेक्षा अधिकपाण्याचे टँकर मागवावे लागले ह्याचा खर्च तब्बल 32 लाखांच्या घरात गेला आहे. त्यामुळे सोसायटी मधील नागरिकांनी सिडको विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या पाणी समस्येचा सर्वात जास्त त्रास महिला वर्गाला होत असून वाढत्या महागाईत घरचे बजेट सांभाळताना कठीण जात असताना आता पाण्यावर होणाऱ्या खर्चामुळे संपूर्ण मासिक बजेट कोलमडले आहे. संपूर्ण दिवस या पाण्यामागे घालवावा लागत असल्याने महिलांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

खारघर हे वाढते शहर असून नवनवीन गृह संकुलाची उभारणी येथे होत आहे. मात्र येथे असणाऱ्या इमारतींना सिडको पाणी पुरवठा करू शकणार नसेल तर नवीन इमारतींना पाणी कसे देणार हा प्रश्न नागरिक विचारत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friendship Day 2025 : 'फ्रेंडशिप डे'ला मित्रांसाठी खास बनवा 'मिष्टी दोई', नात्यात वाढेल गोडवा

Marathi Film Awards: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा; महेश मांजरेकर, मुक्ता बर्वेसह 'या' कलाकारांचा होणार सन्मान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

Amravati News: ग्रामपंचायत कार्यालय बनला कुस्तीचा आखाडा; सरपंच आणि सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी|VIDEO

अंगावर लघवी अन् प्रायव्हेट पार्टवर काठीनं मारलं, बिल्डरचा २ तास छळ; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT