jitendra awhad  saam tv
मुंबई/पुणे

गरिबांना मिळणार घरं! गृहनिर्माण मंत्र्यांनी नाशिककरांसाठी केली मोठी घोषणा

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नाशिकरांसाठी मोठी घोषणा केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नाशिकरांसाठी मोठी घोषणा केली आहे. अनेक दिवसांपासून नाशिकमधील काही अधिकाऱ्यांवर म्हाडाची घरं न दिल्याचा आरोप केला जात होता. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की २०१३ पासून लपवली गेलेली घरं नाशिकरांना मिळणार आहेत. नाशिककरांसाठी (Nashik) ५ हजार घरांची घोषणा केली आहे.

त्याचबरोबर जहांगिरपुरीतील कारवाईवरही आव्हाडांनी मत व्यक्त केले आहे. काल सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील जहांगीरपुरी बाबत निर्णय दिला. पण तेथील अधिका-याने सांगितले की अधिकृतपणे आदेश आला नाही. ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली आहे. देशात पहिल्यांदा असे पाहायला मिळाले आहे. अराजकता सर्व पक्षाला धोक्याची आहे. भोंगा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयचा पालन केले पाहिजे. भोंगा फक्त दंगलींसाठी वाजविला जात आहे असे स्पष्ट मत जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केले आहे.

कोरोना काळात अनेक मंत्र्यांनी सरकारी रुग्णालये सोडून खासगीमध्ये उपचार घेतले. परंतु सर्वसामान्य लोकांवरती वाईट वेळ आली या प्रश्नावर बोलताना आव्हाड म्हणाले की आम्ही वाचलो हे महत्त्वाचं नाही काय तुमच्यासाठी. बातमी म्हणून चांगले आहे. मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार केला आणि सरकारी रुग्णालयात का केला नाही असे प्रश्न विचारले जात आहेत.

तुम्हा आम्हाला सर्वाना माहित आहे की सरकारी रुग्णालयाची ताकद काय होती? कोण मंत्री खासगी रुग्णालयात उपचार केले आहे, असे बोलून आग लावायचा प्रयत्न करू नका असे म्हणत आव्हाडांनी पत्रकारांना सुनावले आहे. निर्मला सीतारामन धर्माच्या नावावर द्वेष पसरवून महागाईवर बोलत नाहीत. संघर्ष पेटवणे हा जगातला सर्वात सोपा कार्यक्रम असल्याचंही आव्हाड म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT